पुणे : आकाशात घोंघावणारे ड्रोन, मल्लखांबावर चित्तथरारक कसरती, रोबोटिक म्यूल आणि लष्कराचे प्रशिक्षित श्वान, कलरीपयट्टू-मार्शल आर्ट्सच्या लक्षवेधक सादरीकरणाला मिळालेली दाद… हेलिकॉप्टरनी दिलेली सलामी… बंदुका, रणगाडे, क्षेपणास्त्र प्रक्षेपक अशी लष्करी सामग्री पाहण्यासाठी झालेली गर्दी… अशा वातावरणात ‘नो युवर आर्मी’ हे प्रदर्शन सुरू झाले.

भारतीय लष्कराचा ‘आर्मी डे परेड’ कार्यक्रम १५ जानेवारी रोजी होणार आहे. या निमित्ताने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब अर्थात रेसकोर्स येथे आयोजित ‘नो युअर आर्मी’ या प्रदर्शनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, उद्योजक पुनीत बालन या वेळी उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवारपर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे.

Changes in traffic in central city Pune print news
पुणे: शहराच्या मध्य भागातील वाहतुकीत आज बदल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Pune Marathi Vs Hindi Fighting Video
Pune Marathi Conflict : पुण्यात मराठी कर्मचाऱ्यांचा पगार थकवला, कार्यालयात हिंदी बोलण्याची सक्ती; मनसेचा खळखट्याक अन्…!
maval assembly constituency
मावळ मतदारसंघात नाट्यमय घडामोडी
kasba peth assembly constituency
‘कसब्या’त दोन्ही बाजूंचा कस, महाविकास आघाडीत बंडखोरी, महायुतीमध्ये नाराजी

हेही वाचा – धर्मसत्तेच्या जनजागृतीतून नवी राजसत्ता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘लष्कराचे प्रदर्शन उत्तम आहे. इतके वैविध्यपूर्ण सादरीकरण पाहण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे लष्कराच्या सामर्थ्याचा अनुभव प्रत्यक्ष घेता येत आहे,’ असे ससून रुग्णालयात अंतिम प्रशिक्षण घेत असलेला डॉ. सिद्धिकेश तोडकर याने सांगितले. तर सहावीत शिकणारा शौर्य वाकोडे म्हणाला, ‘लष्कराच्या जवानांनी केलेले सादरीकरण खूप आवडले. असे प्रदर्शन पहिल्यांदाच पाहत आहे. हे प्रदर्शन पाहून लष्करात जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.’

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संरक्षण क्षेत्रात नवे नवउद्यमी कशा प्रकारचे काम करतात, कशा प्रकारचे नवसंशोधन झाले आहे, हे या प्रदर्शनात पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या क्षमता चांगल्या प्रकारे विकसित केल्या आहेत. लष्करानेही विविध प्रकारच्या यंत्रणा विकसित केल्या आहेत. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने भारत आता पूर्णपणे सुरक्षित आहे. जमिनीवरून, आकाशातून किंवा समुद्र मार्गाने कोणताही हल्ला परतवून लावू शकतो, असे सांगून नागरिकांना लष्कराच्या अधिक जवळ नेणे, युवकांना प्रेरणा देणे, त्यांना लष्करासोबत काम करण्यासाठी उद्युक्त करणे हा प्रदर्शनाचा उद्देश असतो.

हेही वाचा – वाल्मीक कराडला तुरुंगात ‘व्हीव्हीआयपी’ वागणूक? मुख्यमंत्री म्हणाले…

मुख्यमंत्र्यांना दोन तास विलंब

उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपेक्षा फडणवीस यांना येण्यास सुमारे दोन तास विलंब झाला. त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले नागरिक, मुलांना थांबावे लागले. प्रतीक्षा करून अखेर विविध कसरतींचे सादरीकरण असलेला उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर नागरिकांना प्रदर्शन पाहण्यासाठी खुले करण्यात आले. फडणवीस आल्यानंतर त्यांनी औपचारिक उद्घाटन केले.

Story img Loader