पिंपरीतील विकासकांनी गणेश विसर्जनासाठी तीन कृत्रिम हौद उपलब्ध करून दिले आहेत. नदी प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून या हौदांमध्ये गणेशमूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.पिंपरीतील आसवाणी असोशिएटस् आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट यांच्या वतीने वैभवनगर येथे सार्वजनिक मंडळांच्या व घरगुती गणेशमृर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे तीन हौद उभारले आहेत. येथे गणेश मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहन आसवानी बंधूंनी केले आहे.
हेही वाचा >>> पुणे : पाटील इस्टेट भागात दोन गटात हाणामारी ; परस्पर विरोधी तक्रारीनुसार गुन्हे दाखल
पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, तानाजीनगर, लिंकरोड परिसरातील गणेश मूर्तींचे या ठिकाणी विसर्जन करता येईल. या ठिकाणी मूर्तीबरोबर असणारे निर्माल्य व सजावटीचे साहित्य वेगळे ठेवण्यासाठी स्वयंसेवक असणार आहेत. श्रींच्या आरतीसह निर्माल्यकुंड, विजपुरवठा, स्वच्छतागृहे, जीवरक्षक आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी विजय आसवानी, राजू आसवानी, श्रीचंद आसवानी, सतीश आसवानी, अनिल आसवानी यांनी पुढाकार घेतला आहे.