लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी १३ ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी पुणे शहर, जिल्हा, तसेच परगावाहून मोठ्या संख्येने नागरिक येतात. विसर्जन सोहळ्यानिमित्त १३ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.
आणखी वाचा-सिंहगडाजवळील सांबरेवाडीत दोन गटात हाणामारी, गोळीबारात तरुणाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी
वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे – शिवाजी आखाडा वाहनतळ, मंगळवार पेठ (दुचाकी आणि चारचाकी), एसएसपीएमएस मैदान (दुचाकी आणि चारचाकी), स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), पेशवे उद्यान, सारसबाग, (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ, (दुचाकी), दांडेकर पूल ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी), संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), फर्ग्युसन महाविद्यालय मैदान (दुचाकी आणि चारचाकी), जैन हाॅस्टेल मैदान, बीएमसीसी रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), मराठवाडा महाविद्यालय (दुचाकी), नदीपात्र ते भिडे पूल (दुचाकी आणि चारचाकी)