पुण्यातील धनंजय घोरपडे या नाट्यनिर्मात्याची मनोज जरांगे पाटील यांच्यासह दोघांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना दोनवेळा कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने बजावले होते. पण मनोज जरांगे पाटील हे आंदोलन आणि वैद्यकीय कारणास्तव कोर्टात हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे कोर्टाने मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोघांवर अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील हे पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. यावेळी आरोपीचे वकील आणि फिर्यादी यांच्या वकीलामध्ये जवळपास तासभर युक्तिवाद झाला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा तीन हजार रुपयांच्या बॉन्डवर अटक वॉरंट रद्द करत पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार असल्याचं न्यायाधीश एस.बिराजदार यांनी सांगितलं.

हे ही वाचा… लोणावळा: खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली

संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये जरांगे पाटील हे उपचार घेत असून डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड संबंधी आजार असल्याचं सांगितले आहे, त्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. या कारणास्तव न्यायालयाचा अटक वॉरंटचा आदेश रद्द करण्यात यावा अशी विनंती जरांगे पाटील यांच्या वकिलांनी केली.

हे ही वाचा… Maharashtra News Live: “रमेश किणी प्रकरणात मोकाट झाल्यामुळे त्यांना वाटतं कुणाचाही जीव घेऊ शकतो”, अमोल मिटकरींचा मनसेवर गंभीर आरोप!

दरम्यान मनोज जरांगे यांनी समाजमाध्यमांद्वारे कोर्टाच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याची बाब फिर्यादीच्या वकिलांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी प्रत्येकाने टाळावी, त्यामुळे अवास्तव कारवाईस म्हणजे न्यायालयाच्या अवमान कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही अशा शब्दात न्यायाधीश एस.बिराजदार यांनी मनोज जरांगे पाटील यांना समज दिली.

Story img Loader