लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पिंपरी परिसरातील एका व्यावसायिकाल मोहजालात अडकवून त्याला लुटणाऱ्या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली.

Murder accused nabbed after 15 years
पत्नीची हत्या, फरार पतीला १५ वर्षांनी अटक
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त
Shantinagar motorcycle thief , Bhiwandi , Tadi ,
ठाणे : ताडी पिण्यासाठी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला, मोक्का आणि जबरी चोरीच्या १८ गुन्ह्यात होता फरारी
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
person who came to Thane for selling whale fish vomit ambergris arrested by thane Polices Crime Investigation Branch
वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत

अक्षय राजेंद्र जाधव (वय २८, रा. कर्वेनगर), शिवाजी गोविंदराव सांगोले (वय ३४, रा. नऱ्हे), भरत बबन मारणे (वय ४५, रा. रामनगर, वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत एका व्यावसायिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक पिंपरी-चिंचवड शहरातील आहे. समाजमाध्यमातून त्याची एका महिलेशी ओळख झाली होती. महिलेने त्याच्याशी संपर्क साधून त्याला वारजे भागातील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले होते. आरोपी जाधव, सांगोले, मारणे तेथे दबा धरून बसले होते.

आणखी वाचा-“मनसेचे १३ आमदार मटक्याच्या आकड्यावर…”, राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

व्यावसायिक हॉटेलजवळ आला. तेव्हा तिघांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली. तू महिलांचे चित्रीकरण करतो. आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी त्याला वारजे भागातील एका बँकेच्या एटीएम केंद्रात नेले. त्याला धमकावण्यात आले. त्याच्या बँक खात्यातून ५३ हजार रुपये काढून घेण्यात आले. व्यावसायिकाकडील रोकड चोरुन आरोपी पसार झाले. घाबरलेल्या व्यावसायिकाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला.

आणखी वाचा-पुणे: सायबर चोरट्यांकडून पॅथोलॅाजिस्ट महिलेची १६ लाखांची फसवणूक

तांत्रिक तपासात आरोपी अक्षय जाधव पुन्हा वारजे भागातील हॉटेलजवळ थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याबरोबर असलेले साथीदार सांगोले आणि मारणे यांना पकडले. पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजय कुलकर्णी, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, अमेल राऊत, अमोल सुतकर, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, राहुल हंडाळ आदींनी ही कारवाई केली. सहायक निरीक्षक ए. बी. ओलेकर तपास करत आहेत.

Story img Loader