पुणे : पाषाण-सूस टेकडीवर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला.

अजिंक्य अशोक बोबडे (वय १८, रा. गुरुकृपा बिल्डींग, वाघजाई चौकाजवळ, नवी सांगवी), निखिल बाबासाहेब डोंगरे (वय १८, रा. साकेत सोसायटी, डीपी रस्ता, ओैंध) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पौजेंदाई कामेई (वय १९, सध्या रा. गंगानगर, जुनी सांगवी) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कामेई मूळचा नागालँडचा आहे. तो पुण्यात शिक्षणासाठी आला आहे. ओैंध भागातील एका महाविद्यालयात तो शिक्षण घेत आहे. कामेई आणि त्याचा मित्र समीर राॅय २८ सप्टेंबर रोजी बामेर परिसरातील पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडीवर फिरायला गेले होते. त्यावेळी बोबडे, डोंगरे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांनी कामेई आणि त्याचा मित्र राॅय यांना कोयत्याचा धाक दाखविला.

A college youth was robbed by a koyta on Hanuman hill pune
हनुमान टेकडीवर कोयत्याच्या धाकाने महाविद्यालयीन तरुणाची लूट; चोरट्यांच्या मारहाणीत तरुण जखमी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
A teacher of a school in Pune brutally beat up a student of class 6 Pune news
शर्ट नीट न खोचल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा
pune bopdev ghat gangrape
पुणे: कोंढव्यातील बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार
students poisoned school Kalwa, Thane,
ठाणे : कळव्यामधील एका शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा
college youth who went for vacation with friend brutally beaten and robbed in Baner hill area
बाणेर टेकडीवर तरुणाला लुटले
Sanjuba Secondary School
वाहनकोंडीमुळे ‘ संजुबा’च्या विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका
Abuse on Girl pune, Pune college Girl Abuse,
पुणे : महाविद्यालयाच्या आवारातच युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा

हेही वाचा >>>भूतकाळाच्या चष्म्यातून… काँग्रेस : तेव्हाची आणि आताची

त्यांच्याकडील दोन मोबाइल संच, रोकड असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. घाबरलेल्या कोमेई आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बोबडे, डोंगरे यांच्यासह अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी लुटमारीचे आणखी काही गुन्हे केले आहेत का ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयानंद पाटील, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक प्रवीण चौगुले, हवालदार श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, बाबा दांगडे, इरफान मोमीन, श्रीधर शिर्के यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा >>>विधी महाविद्यालय रस्त्यावरील सोसायटीत चंदन चोरी, चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना वाढीस

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे आरोपी जाळ्यात

पोलीस कर्मचारी श्रीकांत साबळे, सचिन बिरंगळ बाणेर भागात गस्त घालत होते. २८ सप्टेंबर रोजी पॅनकार्ड क्लब रस्त्यावरुन दुचाकीवरुन आरोपी निघाले होते. त्यावेळी गस्त घालणाऱ्या साबळे आणि बिरंगळ यांनी आरोपींना पाहिले. संशयावरुन दोघांची चौकशी केली. तेव्हा दुचाकीवरील दोघे जण पसार झाले. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी पाषाण टेकडी परिसरात तरुणाला लुटल्याची कबुली दिली.