पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वकिलांनी न्यायालयातत घटनाक्रम सांगितला. दोन वकिलांच्याा पोलीस कोठडीत वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी दिले. या खून प्रकरणातील आरोपींना वकील १५ डिसेंबर रोजी भेटले होते, असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.

ॲड. रवींद्र वसंतराव पवार (वय ४०, रा. नांदेगाव, ता. मुळशी), ॲड. संजय रामभाऊ उडान (वय ४३, रा. भुसारी कॉलनी, कोथरुड) अशी पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या आरोपी वकिलांची नावे आहेत. या खून प्रकरणात ॲड. पवार, ॲड. उडान यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. वकिलांची पोलीस कोठडी सोमवारी संपली. त्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Ajit Pawar Statement About Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”
In Kalyan East on Saturday night migrant family abused and beat up three members of Marathi family
सराफी पेढीवर दरोडा टाकणारा चोरटा गजाआड
Sharad Pawar
“…तोवर शांत बसणार नाही”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून शरद पवारांचा मस्साजोगमधून सरकारला इशारा
Sharad Pawar
“या प्रकरणाचा सूत्रधार…”, मस्साजोगच्या ग्रामस्थांसमोर शरद पवार गरजले; संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत घेतली मोठी भूमिका
Sharad Pawa
संतोष देशमुखांच्या मुलांचं शिक्षण ते कुटुंबाचं संरक्षण; मस्साजोगमध्ये शरद पवारांची मोठी घोषणा

मोहोळचा खून केल्यानंतर आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि साथीदार साताऱ्याकडे पसार झाले. आरोपी वकील पवार आणि उडान पोळेकर आणि साथीदारांना खेड शिवापूर परिसरातील टोलनाक्याच्या परिसरात भेटले. तेथून ॲड. पवार आणि ॲड. उडान आरोपींसोबत मोटारीत होते. आरोपीच्या एका नातेवाइकाने नवीन सिम कार्ड दिले. आरोपींनी वकिलांच्या समोर सिम कार्ड बदलले. आरोपींच्या मागावर पोलिसांचे पथक होते. आरोपी वकिलांना पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, रोकड, मोबाइल संच जप्त करण्यात आले, अशी माहिती तपास अधिकारी कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी न्यायालयात दिली.

हेही वाचा : पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’; टोळीयुद्ध नेमकं कधी सुरू झालं? शरद मोहोळच्या खुनानंतर पोलिसांसमोर काय आव्हान?

तपास अधिकाऱ्यांनी आमचा जबाब नोंदविला आहे. मात्र, काही मुद्दे जाणीवपूर्वक दडवले जात आहेत. मोहोळचा खून झाला. त्यावेळी मी न्यायालयात होता, असे आरोपी वकील ॲड. रवींद्र पवार यांनी न्यायालयात सांगितले. मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि अन्य आरोपी ॲड. संजय उडान यांचे अशील आहेत. ॲड. उडान आणि मी सोबत वकिली करतो. मोहोळच्या खूनानंतर आरोपींना शरण यायचे होते. त्यांना मदत हवी असल्याचे ॲड. उडान यांनी मोबााइलवर संपर्क साधून सांगितले. न्यायालयातील काम आटोपल्यानतर मी मोटारीतून ॲड. उडान यांच्या बरोबर आरोपींना सांगितलेल्या ठिकाणी गेलो. त्यानंतर मी पूर्वी कोथरुड पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. आरोपींना शरण यायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर आरोपींना टोलनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर भेटलो. आरोपींना शरण यायचे होते. पोलीस मागावर होते. त्यामुळे त्यांनी आमच्या मोटारीतून प्रवास केला, असे ॲड. पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : कोण होता शरद मोहोळ? वाचा ‘हिंदू डॉन’ अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरदची रक्तरंजित कहाणी…

मोहोळच्या खुनानंतर आरोपी पसार झाले. आरोपींनी ॲड. पवार आणि ॲड. उडान यांच्याशी संपर्क साधला. त्यांना शरण यायचे होते तर ते साताऱ्याकडे का पसार झाले. सिमकार्ड बदलण्याचा हेतू काय आहे, या दृष्टीने तपास करायचा आहे. आरोपी वकिलांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकील ॲड. निलिमा इथापे-यादव यांनी युक्तिवादात केली. आरोपी वकिलांच्या वतीने ॲड. सुधीर शहा आणि ॲड. एन. डी. पाटील यांनी बाजू मांडली. आरोपी वकील हल्लेखोर नाहीत. त्यांच्याविरुद्ध खून करणे, तसेच अन्य अजामीनपात्र कलमे लागू होत नाहीत. वकिलांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आाल नाही. वकिलांना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती ॲड. पाटील यांनी युक्तीवादात केली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यनंतर ॲड. पवार आणि ॲड. उडान यांच्या पोलीस कोठडीत ११ जानेवारीपर्यंत वाढ करण्याचे आदेश देण्यात आले.

Story img Loader