पुणे : महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली. संतोष बाळासाहेब लवांडे (रा. लवांडे वस्ती, शिंदेवाडी, अष्टापूर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने लोणींकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडीत महिलेची आराेपीची ओळख आहे. त्याने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेचे मोबाइलवर छायाचित्रे लवांडे यांनी काढली. समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर लवांडेला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा