पुण्यात फ्लॅट धारकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील नेरे येथे द व्हिलेज रेसिडेन्सीमध्ये ३५ जणांना फ्लॅट देण्याच आमिष दाखवून ४ कोटी १४ लाख २७ हजारांची आर्थिक फसवणूक केली होती. बांधकाम व्यावसायिकाने उच्चशिक्षित असलेल्या फ्लॅट धारकांना खरेदी खत करून आपल्या जाळ्यात ओढले आणि फ्लॅटचा ताबा न देताच आरोपी पसार झाला होता.
प्रतीक आगरवाल पुणे, असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर, किरण, आणि विनय अशी इतर साथीदारांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पिंपरी- चिंचवड शहरात अशा प्रकारे फ्लॅट धारकांची आर्थिक फसवणूक झाली असेल तर याबाबत त्यांनी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली आहे.
हेही वाचा: संतापजनक! वडील, चुलत्याने केला १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार; आजोबांकडून विनयभंग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नेरे येथे द व्हिलेज रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट धारकांना फ्लॅट देतो असे आमिष दाखवून एकूण ३५ जणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. हे सर्व फ्लॅट धारक उच्चशिक्षित असल्याची माहिती पुढे येत आहे. २०१८ मध्ये नेरेत ही सोसायटी उभारण्यात आली तेव्हा फ्लॅट धारकांना खरेदी खत तयार करून दिलं, पण प्रत्येक्षात फ्लॅटचा ताबा न देताच मुख्य आरोपी प्रतीक आगरवाल पसार झाला होता. त्या सोसायटीच्या इमारतीचं बांधकाम देखील अर्धवट झाल्याचं समोर आलं आहे. २०१८ मध्ये या प्रकरणी हिंजवडी पोलिसात मनमिंदरसिंग वय- ५५ पुणे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द करत प्रतीक आगरवालला हजर होण्यास सांगितले होते. मात्र, न्यायालयाचा अवमान करत तो पसार झाला होता. अखेर दोन वर्षांनी प्रतीकला गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून आणखी काही जणांची फसवणूक झाल्याचं समोर येऊ शकत अस गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांनी सांगितलं आहे. रांची आणि हैद्राबाद येथे आरोपी बांधकाम व्यवसायिक प्रतीक हा प्रस्थ बसवण्याचा मार्गावर होता. त्याअगोदरच रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रतीकला नाशिक रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली.