लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गणरायापाठोपाठ माहेरवाशीण म्हणून तीन दिवसांच्या मुक्कामासाठी मंगळवारी (१० सप्टेंबर) येणाऱ्या गौरी आवाहनासाठी सुवासिनींची लगबग सुरू झाली आहे. अनुराधा नक्षत्रावर मंगळवारी गौरींचे आगमन होणार आहे. अनुराधा नक्षत्र रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत असल्याने दिवसभरात आपल्या सोईनुसार गौरी आवाहन करता येणार आहे. मंगळवारी देवीच्या वारी महालक्ष्मींचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सज्ज झाल्या आहेत.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

ऋषिपंचमी रविवारी आल्यामुळे गौरींच्या सजावटीसाठी सुवासिनींची तयारी सुरू होती. सोमवारी आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने नोकरीचा व्याप सांभाळून गौरींचे मुखवटे, नव्या साड्या, अलंकाराची खरेदी करण्याबरोबरच पूजा साहित्य, फुलांचे हार, गजरे, वेण्या खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. सजावट साहित्याच्या दुकानातही महिलांची गर्दी झाली होती. तर काही सुवासिनी गौरीच्या नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ तयार करण्यामध्ये व्यग्र होत्या. पावसाने विश्रांती घेतल्याने महिलांच्या खरेदीच्या लगबगीत गैरसोय झाली नाही.

आणखी वाचा-श्रीमंत ‘दगडूशेठ हलवाई गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक

गणपतीनंतर दोन-तीन दिवसांत येणाऱ्या गौरी म्हणजे महिलांसाठी आनंदाची पर्वणी असते. घरातील मंगल कार्याप्रमाणे महिला गौरींच्या स्वागताची जय्यत तयारी करतात. गौरींच्या मुखवट्यांना चकाकी करण्याबरोबरच नवीन साड्या, अलंकार आणि आराशीचे साहित्य खरेदीची लगबग सुरू आहे. पूजा साहित्य, फूल, भाज्यांच्या खरेदीसाठी महिला सोमवारी सकाळीच बाहेर पडल्यामुळे मंडई, शनिपार आणि हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात गर्दी झाली होती. फुलांमध्ये निशिगंध, ॲस्टर, शेवंती, मोगरा यांसह पत्री आणि दुर्वांना सर्वाधिक मागणी होती.

घराण्याचा कुलाचार सांभाळण्याबरोबरच हाताशी असलेल्या अपुऱ्या वेळेमुळे अनेक महिलांनी फराळाचे आयते पदार्थ आणि मिठाई घेतली. अनेक महिलांनी फराळाचे पदार्थ घरी करण्याऐवजी ते बचत गटांतील महिलांकडून विकत घेण्याचा पर्याय निवडला.

आणखी वाचा- ‘हे खा’, ‘ते खा’ सांगणे म्हणजे धर्म नव्हे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत

दागिन्यांची खरेदी

गौरींची सजावट करताना अनेक घरांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने परिधान केले जातात. त्याचबरोबरीने मोत्यांची चिंचपेटी, तोडे, कंबरपट्टा, मोती हार अशा कृत्रिम दागिन्यांना अधिक पसंती आहे. सुवासिनींकडून तोडा बांगडी, हिरव्या बांगड्या, हिऱ्यांचा मोठा राणीहार, नथ, ठुशी खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या दागिन्यांना चांगली मागणी आहे.

आवाहनासाठी संपूर्ण दिवस शुभ

अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन केले जाते. मंगळवारी (१० सप्टेंबर) अनुराधा नक्षत्र रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत असल्याने दिवसभरात आपल्या सोईनुसार कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे. बुधवारी (११ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे गौरीपूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने गुरुवारी (१२ सप्टेंबर) रात्री नऊ वाजून ५३ मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन करता येईल, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.