पुणे : आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होणार असून जवळपास महिनाभराचा कालावधी राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ आणि प्रत्येकाच्या घरात गणरायाच्या आगमनानिमित्त यंदाच्या वर्षी कोणता देखावा करायचा, कशा प्रकारे गणरायाचे स्वागत करायचे याची चर्चा सुरू आहे. त्याच दरम्यान आज पुणे शहरातील मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे जोरदार पावसात आणि ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले.

आपल्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी पुणेकर नागरिकांनी गर्दी केली होती. तर मिरवणुकीचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना अनेक पुणेकर नागरिक पाहण्यास मिळाले. ही मिरवणूक पालखीमधून रमणबाग शाळा, ओंकारेश्‍वर मंदिर, नारायण पेठ पोलीस चौकी आणि केसरी वाडा या मार्गाने काढण्यात आली.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
Adani group, dharavi, Adani group dharavi banner,
नवे सरकार सत्तेवर येताच अदानी समुहाकडून धारावीत जोरदार फलकबाजी, बहुभाषिक धारावीत गुजराती फलकांचाही समावेश

हेही वाचा – “डॉ. दाभोलकरांचा खून होऊन ३ हजार ५०० दिवस झाले, केंद्र-राज्य…”; अंनिसचं पुण्यात अभिवादन

हेही वाचा – VIDEO: गोष्ट पुण्याची : सुंदर हिराबाग आणि रंजनमहालाचा पेशवाई इतिहास!

मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे अध्यक्ष दीपक टिळक, विश्वस्त रोहित टिळक यांच्यासह मंडळाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रोहित टिळक म्हणाले की, गणरायाच्या आगमनाची आपण सर्वजण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. त्या गणपती बाप्पाचे १९ सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. पण मानाचा पाचवा केसरी वाडा येथील बाप्पाचे आगमन टिळक पंचांगानुसार दरवर्षी होत असते. त्यानुसार आज गणपतीचे आगमन होते. त्या पार्श्वभूमीवर केसरीवाडा येथे पुढील महिनाभर विविध कार्यक्रमांच आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader