पुणे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दुपारी २.२० च्या सुमारास लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, दक्षिण मुख्यालयाचे अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रपतींच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), लोणावळा येथील नौदलाच्या आयएनएस शिवाजी, लोणावळ्यातील कैवल्यधाम येथील योगसंस्था येथे उपस्थिती लावणार आहेत. गुरुवारी (३० नोव्हेंबर) ‘एनडीए’च्या १४५ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलन सोहळ्याला त्यांची उपस्थिती असणार असून, या वेळी स्नातकांच्या वतीने त्या मानवंदना स्वीकारणार आहेत. त्यानंतर नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट देऊन पुण्यातील राजभवन येथे मुक्कामी येणार आहेत.

हेही वाचा… पुणे शहराला बुधवारी सकाळी पडला होता धुक्याचा वेढा

१ डिसेंबर रोजी राष्ट्रपती मुर्मू राजभवन येथून वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानंतर पुणे दौरा आटोपून दुपारी लोहगाव विमानतळावरून नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.