लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : भोगीनिमित्त मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची मोठी आवक झाली. भाज्यांना मागणी वाढल्याने भेंडी, पापडी, वालवर, पावटा, वांगी, गाजर, भुईमुग शेंग या फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून १५० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, राजस्थानातून २८ ते ३० टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून २८ ते ३० ट्रक मटार, तमिळनाडूतून १ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
आणखी वाचा-शनिवारवाड्याजवळ ज्येष्ठ महिलेची फसवणूक, बतावणी करुन मंगळसूत्र चोरी
पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, कांदा १२५ ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून २५ ते ३० टेम्पो बटाट्याची आवक झाली.
पालेभाज्यांच्या दरात वाढ
भोगी, तसेच संक्रातीमुळे पालेभाज्यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत अल्पशी वाढ झाली. कोथिंबिर, शेपू, मेथी, कांदापात, पुदिना, राजगिरा, चुका, पालक, हरभरा गड्डीच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. तरकारी विभागात कोथिंबीर ७० हजार जुडी, मेथीच्या ७० हजार जुडी, तसेच हरभरा गड्डीची ५० हजार जुडीची आवक झाली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ८०० ते १५००, मेथी -१००० ते १२००, शेपू – ७०० ते ८००, कांदापात- ८०० ते १२००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ३०० ते ८००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ७००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ३००-७००, पालक- ८००-१२००. हरभरा गड्डी – ५०० ते १५००
आणखी वाचा-सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
बोरे, लिंबाच्या दरात वाढ
मार्केट यार्डातील फळबाजारात बोरे, लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. सीताफळ, चिकू, अननस, मोसंबी, डाळिंबाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी जुन्या आणि नव्या बहरातील मोसंबी ३० ते ४० टन, संत्री ५० ते ६० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई १८ ते २० टेम्पो, लिंबे २००० गोणी, कलिंगड १० ते १२ टेम्पो, खरबूज ५ ते ६ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू ३०० ते ४०० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ६ ट्रक, बोरे साडेसात ते आठ हजार गोणी, सीताफळ २ ते ३ टन अशी आवक झाली.