श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

समाजातील एखादा प्रश्न किंवा विषय हाती घेऊन तो सोडवण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था पुण्यात आहेत. या संस्थांनी सेवाध्यासाचा आदर्श उभा केला आहे. विविध सामाजिक प्रश्न-समस्या सोडविण्यासाठी कार्य करणाऱ्या अशा संस्थांची ओळख ‘सेवाध्यास’ या सदरातून होईल. ज्या योगे एखादी समस्या उद्भवली, तर संबंधित सामाजिक संस्थेची जशी मदत घेता येईल, तसेच विशिष्ट सेवाकार्यासाठी आर्थिक योगदानापासून ते संस्थेसाठी काही वेळ देण्याची इच्छा असणाऱ्यांपर्यंत सर्वाना उपयुक्त माहितीही मिळू शकेल.

Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
zopu yojana audit
मुंबई : थकित भाड्याची तक्रार आल्यास आता झोपु योजनेचे ॲाडिट!
yavatmal ashok uike loksatta news
यवतमाळ : शिस्तप्रिय भाजपमध्ये धुसफूस…मंत्र्याच्या सत्कार समारंभातच…
Avimukteshwaranand Saraswati Criticized mohan bhagwat
Avimukteshwaranand Saraswati : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भडकले शंकराचार्य, “सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप सुरु होता, आता…”
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
Prostitution risen in Nagpur
नागपुरात खुनाच्या घटनाच नव्हे, देहव्यापारही वाढला…गल्लोगल्ली उभारलेल्या मसाज-स्पामध्ये…

सावली चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या दहा वर्षांपासून आदिवासी भागांमध्ये कार्यरत आहे. तेथे वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा, पोषक आहार, कौशल्य तंत्रज्ञान विकास, नळ पाणी योजना, युवक सबलीकरण योजना आदी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविले जात आहेत. आदिवासी भागातील महिलांचे बचत गट तयार करण्यात आले असून त्यामार्फत काही उत्पादनांची निर्मिती केली जाते. ही उत्पादने पुण्यामुंबईसारख्या शहरांमध्ये विकली जातात. त्यातून या महिलांसाठी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यात ‘सावली’ यशस्वी ठरली आहे.

या विविध सामाजिक कार्याबरोबरच ‘सावली ने गेल्या दोन वर्षांपासून एक नवा उपक्रम सुरू केला आहे. आपल्या देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर कामगिरी बजावणारा जवान एखाद्या मोहिमेत धारातीर्थी पडल्यानंतर त्या जवानाच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून संस्थेतर्फे एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अशा जवानाच्या कुटुंबीयांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी काही शासकीय योजना आहेतही. पण काही वेळा त्या तोकडय़ा पडतात तर काही वेळा या योजनांपर्यंत पोहोचण्यासाठी वीरपत्नी असमर्थ असतात.

काही वेळा पतीने हौतात्म्य पत्करल्यानंतर या वीरपत्नींना आपले राहते घरही सोडावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वेळा सासरच्या मंडळींच्या असहकार्यामुळे वीरपत्नीला घर सोडावे लागले आहे. तर काही वेळा मिळणाऱ्या निवृत्तिवेतनात सासरीची मंडळी वाटेकरी होतात आणि वीरपत्नीसह मुलांची दुरवस्था होते. अशा वेळी मुलांचे शिक्षण वगैरे या गोष्टी तर कोसो मैल दूर राहतात. अशी वीरपत्नींना ‘सावली चॅरिटेबल ट्रस्ट’ आर्थिक साहाय्य करते. त्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा भार ‘सावली’मार्फत उचलला जातो. अर्थातच हे सगळे करीत असताना काही कागदपत्रांची पूर्तता वीरपत्नीने करणे आवश्यक असते. त्याची शहानिशा केल्याशिवाय कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. या मदतीला वेगळ्या वाटा फुटू नयेत म्हणून मुलांचे शैक्षणिक शुल्क शाळांकडे हस्तांतरित केले जाते. शिशु वर्गात शिकणाऱ्या मुलांपासून अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत केली जाते. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक गरजा देखील विविध प्रकारच्या आणि विविध मूल्यांच्या. पण त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यात संस्था कोणतीही कसूर ठेवत नाही. गेल्या वर्षी सतरा विद्यार्थी तर यंदा तेवीस मुलांचा शैक्षणिक भार संस्थेने उचलला आहे. संस्थेचे एक विश्वस्त निवृत्त मेजर जनरल संजय भिडे त्यांच्या सैन्यातील शिस्तीने, जागरूकतेने या कार्यात सहभागी झाले आहेत. वीरपत्नींच्या अडीअडचणी समजून घेण्याच्या कामात भिडे यांची पत्नी सुषमा त्यांना मदत करतात. संजय भिडे यांच्या कार्यकाळातही त्यांनी अनेक सामाजिक कार्यात रस घेतला होता. या संवादामुळे जवानाच्या कुटुंबीयांच्या अडचणी तर त्यांना समजतातच, पण या मोकळ्या संवादातून वीरपत्नींना मदतही मिळते. उगाचच आर्थिक मदत मिळते आहे, म्हणून ती घेण्यापासून काही कुटुंब दूर राहिल्याचेही भिडे आवर्जून सांगतात.

‘सावली’च्या कार्यात सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक मदत देण्याच्या कार्याची भर पडली ती अभय देसाई, डॉ. चंद्रशेखर कर्वे आणि आनंद माडीवाले यांच्यामुळे. देसाई यांनी या उपक्रमासाठी सुरुवातीला रोज एक रुपया देगणी द्यावी असे आवाहन करीत सुरुवात केली, पण यात काही अडचणी येऊ लागल्यानंतर देगणीदार वर्षांचे, पाच वर्षांचे, दहा वर्षांचे अशा पटीने या कार्याला मदत करू लागले आहेत, हा अनुभव सुखद असल्याचे देसाई नमूद करतात. या कामापूर्वी संस्थेने ‘आर्मी पॅराप्लॅजिक’च्या पाच जवानांच्या मुलांना शैक्षिणिकदृष्टय़ा अनेक वर्षांसाठी दत्तक घेतलेले आहेच.

ज्या वीरमातांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी अर्थसाहाय्य लागणार आहे किंवा ज्या हातांना ‘सावली’ च्या उपक्रमांत सहभागी व्हायचे आहे ती मंडळी ८३९०६८९४९४ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

‘सावली’ च्या कार्याला विनायक देवधर यांनी मुंबईतून सुरुवात केली. त्यात त्यांची पत्नी माधवी यांचाही नित्याचा सहभाग असतो. आदिवासी भागांमध्ये वारंवार जाणे, तेथील गरजांची पाहणी करणे, त्यांची पूर्तता करण्यासाठी तत्पर राहणे यासाठी देवधर दांम्पत्य क्रियाशील असते. गेल्या चार वर्षांपासून भिडे आणि इतर विश्वस्त पुण्यातून या कार्यासाठी मोलाची मदत करीत आहेत. सन २००७ साली स्थापन झालेल्या ‘सावली’च्या माध्यमातून हे काम अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. दुर्गम, डोंगराळ भागातील गावांची निवड ‘सावली’ने केलेली असून या गावांबरोबरच गावांची भौगोलिक बंधने न मानता गरजूंना मदत हाच ध्यास संस्थेने ठेवला आहे. या शिवाय संस्था अनेक रुग्णपीडितांना कर्करोग, हृदयरोग, क्षयरोग आदी आजारांत देखील साहाय्य करते. यासाठी गावांच्या, शहरांच्या सीमा संस्थेने ओलांडल्यापासून जेथे गरज तेथे संस्था यातून या वर्षी संस्थेने सव्वीस व्यक्तींना बारा लाखांपर्यंत आर्थिक साहाय्य केले आहे.

Story img Loader