टीव्ही पाहण्याची चंगळ गेल्या दोन-तीन दशकांत जगभर फोफावली, कारण बातम्या, खेळ, चित्रपट, गाणी, विज्ञान, कार्टून, शैक्षणिक कार्यक्रम, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन अशा प्रत्येकाला हवे ते, हव्या त्या स्वरूपात देण्यासाठी स्वतंत्र दूरचित्रवाहिन्या सरसावल्या. आजतागायत जगात १५ हजार टीव्ही वाहिन्या दर्शकांची चोवीस तास दृश्यभूक भागवत आहेत. जगभरच्या वाहिन्यांची भारत ही मोठी बाजारपेठ आहे. डिस्कव्हरीची ‘अॅनिमल प्लॅनेट’ सारखी पूर्ण वेळ प्राणिजगताची इत्थंभूत माहिती देणारी वाहिनी प्रेक्षकांचा अदमास घेण्यासाठी सुरू झाली. भारतात या वाहिनीला मिळालेला उदंड प्रतिसाद इथल्या प्राणिप्रेमी जगताचे चित्र स्पष्ट करणाराच होता. दीड दशकात प्राण्यांविषयी नवनव्या वैश्वानिक शोधांमुळे अॅनिमल प्लॅनेटने जागतिक यश कमावले. प्राणिप्रेमींचे माहितीपर मनोरंजन या वाहिनीने केले. पण या दरम्यान, प्राण्यांसाठीही मनोरंजन वाहिनी का उभारली जाऊ नये, याबाबत वेगवेगळ्या अचाट कल्पना मांडण्यात आल्या. या कल्पनांचा परिपाक म्हणजे दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत सुरू झालेली ‘डॉग टीव्ही’ ही संपूर्णपणे श्वानांसाठी तयार करण्यात आलेली वाहिनी. श्वानप्रेमींना श्वानांवरील कार्यक्रम दाखवणारी ही वाहिनी नाही, तर याचे प्रेक्षकच श्वान आहेत. सध्या श्वानपालकांनी या वाहिनीला स्वीकारले आहे. जगातील तेरा देशांत ही वाहिनी दिसते; आणि येत्या काळात भारतातही तिचे प्रक्षेपण सुरू करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा