उंच टॉवर्स, मोठे रखरखीत रस्ते, चकचकीत मॉल्स अशा इमारतींच्या जंगलात मोकळी मैदाने, उद्याने यांची जागा हळूहळू कमी होऊ लागली. मोठे आवार, परिसरही जाऊन कुटुंबही तीनचार खोल्यांच्या सदनिकेत एकवटले. त्याचवेळी ‘ग्लोकल’ प्रवास सुरू झालेल्या कुटुंबांमध्ये परदेशी श्वान प्रजाती घरातील भाग झाल्या. घरातल्याच सदस्याप्रमाणे श्वानांचाही विचार होऊ लागला. मालकाच्या मनगटावरील घडय़ाळानुसार फिरण्याचे, खेळण्याचे वेळापत्रक श्वानांची दैनंदिनीचा भाग झाला. रोजचा व्यायाम, फिरणे, भरपूर खेळणे हे श्वानआरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले घटक हळूहळू जीवनशैलीनुसार दुर्लक्षित होऊ लागले आणि त्याचा श्वानांच्या आरोग्यावर दुष्परिणाम दिसू लागले. पाळीव श्वानांसाठी फिरण्याची हक्काची जागा ही गरज झाली आणि त्यातून शहरी आणि निमशहरी भागात ‘पेट पार्क’ची संस्कृती उदयाला आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्वानांची भीती, त्याच्या भुंकण्याच्या आवाजाचा त्रास, खेळण्यासाठी लागणारी पुरेशी जागा अशा अनेक गोष्टींमुळे बहुतेक सार्वजनिक उद्यानांमध्ये श्वानांना फिरायला नेण्यासाठी बंदी असते. अगदी भल्या पहाटेपासून रस्त्यावरील भरधाव रहदरीतून फिरण्यासाठी श्वानांना साखळी लावणेही अपरिहार्य होते. श्वानांना मोकळेपणाने खेळता यावे, पुरेसा व्यायाम व्हावा यासाठी पाळीव श्वानांना खेळण्यासाठी उद्याने सुरू करण्याची मागणी श्वानपालकांकडून अनेक शहरांमध्ये जोर धरू लागली. त्यातून पुणे, मुंबई, नाशिक अशा भागांमध्ये आता ‘पेट पार्क’ सुरू झाली आहेत. खासगी, शासकीय किंवा सार्वजनिक ठिकाणी काही वेळ राखीव ठेवणे असे या पेट पार्कचे स्वरूप आहे. मुंबईत चार सार्वजनिक उद्यानांमध्ये ठरावीक वेळ हा श्वानांना फिरवण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. पुण्यात एकाच सार्वजनिक उद्यानात रविवारी सकाळचा वेळ श्वानपालकांना प्रवेश असतो.

खासगी उद्यानांचा वरचष्मा

श्वानप्रेमाची संस्कृती भारतात स्वीकारली गेली असली, तरीही त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मक्ता खासगी क्षेत्रानेच उचलला आहे. पाळीव प्राण्यांसाठी सेवा देणाऱ्या संस्थांकडून खासगी ‘पेट पार्क’ ची उभारणी करण्यात आली आहे. मासिक सदस्यत्व किंवा दिवसाचे काही शुल्क देऊन या पार्कमध्ये आपल्या श्वानाबरोबर खेळण्याचा आनंद घेता येतो. खेळण्यासाठी वेगवेगळी उपकरणे, पोहण्याचा तलाव अशा सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. श्वान आणि मालक एकत्र पोहू शकेल असेही तलाव उभारण्याची कल्पना काही पेट पार्कमध्ये राबवली जाते. अगदी पाचशे रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत शुल्क यासाठी आकारण्यात येते. आता देशपातळीवर काम करणाऱ्या काही मोठय़ा संस्थांकडून अशी ‘पेट पार्क’ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नव्याने तयार होणाऱ्या टाऊनशिप, रहिवासी सोसायटय़ांमध्ये आता पोहण्याचा तलाव, व्यायामशाळा, सभागृह, थिएटर यासुविधांबरोबरच ‘पेट पार्क’चा समावेशही आवर्जून करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

शिस्त लावण्याचाही प्रयत्न

श्वानाला फिरायला नेण्यामागे नैसर्गिक विधींसाठी त्याला वेळ मिळणे हे देखील मुख्य कारण आहे. रस्त्यावर, पदपथांवर होणारी अस्वच्छता टाळण्यासाठी ‘कुत्र्यांचे स्वच्छतागृह’ उभारण्याची संकल्पनाही पुण्यात राबवण्यात आली आहे. श्वानांना ठरावीक ठिकाणी नैसर्गिक विधी करण्याची सवय लागू शकते. त्यानुसार बागेमधील ठरावीक जागा राखीव ठेवून तेथेच श्वानांना नैसर्गिक विधी उरकण्याची सवय लावण्यात यावी यासाठी जागृती करण्याचे उपक्रमही राबवण्यात येत आहेत. सिंहगड रस्त्यावरील एका रहिवासी सोसायटीमध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.

श्वानपालकांचा मेळा

अनेक पेट पार्क किंवा डॉग पार्कमध्ये राखून ठेवलेल्या वेळात श्वानपालकांची आपल्या श्वानांसह गर्दी झालेली असते. नेहमी फिरायला येणारे लोकांचे जसे शहरांमध्ये गट निर्माण झालेले आहेत, तसेच या पार्कमध्ये नेहमी येणाऱ्या श्वानपालकांचेही गट निर्माण झाले आहेत. या बागांमध्ये श्वानांना एकत्र खेळण्यासाठी सोडले जाते. काही गट एकत्र येऊन वेगवेगळे खेळ, उपक्रम यांचेही आयोजन करतात. केनल क्लब सारख्या चौकटीतील संकल्पनेच्या बाहेर जाऊन तयार झालेले यातील गट श्वानांसाठी वेगवेगळ्या स्पर्धाही आयोजित करतात. वेगवेगळ्या जातीचे श्वान पाळणाऱ्या पालकांच्या अनुभवांची देवाण-घेवाण या उद्यानांमध्ये होते.