अखेर तुकाराम मुंढे यांची बदली झाली. या घटनेचा सर्वात जास्त आनंद पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना झाला, असे कुणाला वाटत असेल, ते साफ चूक आहे. खरा आनंद भाजपच्या नेत्यांना झाला. त्यांच्यासाठी मुंढे हे कर्दनकाळ ठरले होते. ते कुणाचेच ऐकत नाहीत आणि कुणालाही कशातही ढवळाढवळ करू देत नाहीत, हा सगळय़ांचा आक्षेप होता. असा हस्तक्षेप करू दिला, की सगळी कामे मनासारखी होऊ शकतात. कुणाची कुठेही वर्णी लावता येते, जी वाहने अस्तित्वातही नाहीत, त्यांचे पुढील वीस वर्षे पुरतील, एवढे सुटे भाग पीएमपीएलच्या खर्चाने खरेदी करता येतात. गेली अनेक दशके पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे हे असे धिंडवडे निघत आहेत आणि एकाही महाभागास त्याबद्दल जराही कणव आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुण्यातील अरुंद रस्ते, त्यावर दरवर्षी नव्याने येणारी वाहने, त्यामुळे निर्माण होणारा प्रदूषणाचा प्रश्न याबद्दल महापालिकेत बसणाऱ्या एकालाही आजवर पाझर फुटलेला नाही. पुण्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आहे, हेच समजत नसल्याने गल्लोगल्ली सिमेंटचे रस्ते करा, असलेले रस्ते अरुंद करून, पदपथ मोठे करून तेथे पथारीवाल्यांसाठी भव्य व्यवस्था करा, आपलेच राजकीय कार्यक्रम करण्यासाठी भव्य नाटय़संकुले उभारा, यासारख्या फडतूस उपक्रमांना अधिक प्राधान्य देऊन हे शहर ‘स्मार्ट’ करण्याचा मूर्ख प्रयत्न सफल करण्यात सगळेच जण मश्गूल आहेत.

त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्याकडे पीएमपीएलचा कार्यभार येणे, ही प्रवाशांसाठी अतिशय उत्साहवर्धक घटना होती. ते यापूर्वी जेथे जेथे काम करीत होते, तेथे त्यांनी झपाटल्यागत काम केले. पण त्यामुळे सगळय़ाच राजकीय पक्षांचे ते शत्रू क्रमांक एक झाले. स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी कोणत्याही राजकीय पक्षास धार्जिणा नसतो. तो या सगळय़ांच्या भ्रष्ट अस्तित्वालाच आव्हान देतो आणि नेमके तेच या सगळय़ांचे दुखणे होऊन बसते. पुण्यासारख्या शहरात अवघ्या एक वर्षांत त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत केलेल्या सुधारणा राजकीय पक्षांना नावडणाऱ्या आणि पीएमपीएलमध्ये काम करणाऱ्यांना अडचणीच्या होत्या.

मुंढे यांचे नेमके काय चुकले? काम न करता वर्षांनुवर्षे उत्तम पगार आणि अन्य सुविधा मिळणाऱ्यांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला. राजकीय नेत्यांना त्यांची खरी जागा दाखवली. पीएमपीएल ही एक खासगी संस्था असून तेथे त्यांनी राजकीय ढवळाढवळ होऊ दिली नाही, अनावश्यक खर्चाला कात्री लावली, कार्यक्षमतेवर भर दिला, पुणेकरांना एक उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला.. हे असे कोणाही सरकारी अधिकाऱ्याने कधीही करता कामा नये. सत्तेत काँग्रेस असो की भाजप. कुणालाही हे असले कार्यक्षमतेचे चाळे आवडत नाहीत. मुंढे यांच्या बदलीने तर हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे भाजप आणि काँग्रेस असा फरक आता राहिलेला नाही आणि याचे श्रेय नि:संशय मुंढे यांच्याकडे जाते. पुण्याची लोकसंख्या पस्तीस लाख असेल, तर डिसेंबर २०१७ अखेर पुण्यातील वाहनांची संख्या ३५ लाख ५० हजार एवढी होती. याचा अर्थ या शहरातील जन्मलेल्या बाळापासून ते सत्तरी पार केलेल्या प्रत्येकाकडे एक तरी वाहन आहे. हे भीषण वास्तव एकही राजकीय पक्ष स्वीकारण्यास तयार नाही. दररोज रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांचा ताण सहन करण्याची क्षमता पुण्यातील रस्त्यांनी कधीच गमावली आहे. त्यामुळे सगळय़ा रस्त्यांवर वाहतूककोंडी सहन करत आणि जीव मुठीत धरून प्रत्येक पुणेकर प्रवास करतो आहे आणि वेळेत पोहोचण्यासाठी याचना करीत आहे. हे बदलण्यासाठी केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करणे हाच एकमेव मार्ग आहे, हेच न समजणाऱ्या नगरसेवकांना आपण पुन:पुन्हा निवडून देतो आहोत. ही आपली चूक आपल्यालाच महागात पडणार आहे.

mukund.sangoram@expressindia.com