बंगल्याच्या आवारात शिरताच समोर कावेने रंगवलेले मोठे देखणे वृंदावन. त्या भोवती फुलझाडांच्या कुंडय़ा, दरवाजासमोरच्या पडदीस लटकवलेली सावली, आवडणारी हिरवी झुंबरे, डाव्या बाजूला फरशांची पायवाट अन् त्याच्या दोन्ही बाजूला फुलांचे ताटवे. अनुजा आपटेच्या परसबागेचे असे आखीव रेखीव नियोजन परसबागेची आवड फार पूर्वीची. घरात जुनी आंबा, चिकूची झाडेही आहेत. चार वर्षांपूर्वी माझी बाग पाहिली अन् हिला ‘कंपोस्ट किडा’ चावला. बंगल्याच्या मागे असलेला कंपोस्टचा हौद पुन्हा सजीव झाला. मी मोठय़ा प्रणामात पालापाचोळा गोळा करते, त्याची माती वापरते. या मातीच्या कार्बन नायट्रोजन रेशो योग्य राहण्यासाठी भाजीवाल्याकडून वाया गेलेली भाजी आणते, हे अनुजाने पाहिले. लगेच भाजीवाल्याकडून कोबी पाला आणून खड्डय़ात घातला. दोन दिवसांनी फोन आला ‘अगं वास येतोय’. विचारलं, ‘किती कोबी पाला आणलास?’ ‘चार पोती भरून आणला’. ‘कोबी पाल्यात खूप ओलं असते तो पटकन् सडायला लागतो. आता त्यात तीन पट कोरडा पाला मिसळ’ असे मी सांगितले. बाई बहाद्दर तिने पाला गोळा करून घातला व पाला व वाया गेलेली भाजी यापासून एकवीस पोती हिरवी माती तयार केली. त्यावर हिची बाग बहरत आहे. घरच्या घरी माती बनवण्याचे तंत्र गवसले आहे. जैविक कचऱ्यावर झाडे बहरतात हे पक्क ठाऊक आहे. गेल्या वर्षी दर्शनी भागात झेंडूची रोपं लावली होती. तो तरारलेला, फुलांच्या वजनाने लवलेला झेंडू पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटत होतं. या वेळी त्या जागी बालसम फुलला आहे. जास्वंदीचे खूप रंग जमवले आहेत. एका कोपऱ्यात निळी, गुलाबी वॉटर लिली सदा फुललेली असते. त्यात गुलाबी कमळाची भर पडली आहे. जुने टायर रंगवून त्यात फुलझाडे लावली आहेत. कुंपणावर कृष्णकमळ सुगंधी फुलांचे वेल आहेत. भाजीपाला फारसा नाही. घरची कमळे, कवठी चाफ्याचे हार करायचे. दारात फुलांच्या रांगोळ्या घालायच्या याची हिला फार हौस. बँकेतली नोकरी करून हे करायचे तसे अवघड पण सुट्टीच्या दिवशी झाडांवर हात फिरवायला, बहरलेली बाग पाहून मिळालेला आनंद इतरांना वाटायला हिला आवडतं.

रुचिरा लेले. बालमैत्रीण. बंगल्यात मोठाली झाड अन् या ऋतूमध्ये होणाऱ्या पानगळीमुळे हैराण झालेली. पण आता पाचोळा ड्रममध्ये, पोत्यामध्ये भरून त्यावर इनोरा कल्चरचे पाणी मारून पोती भरून ठेवते. अधून मधून पाण्याचा फवारा देते. जसे जसे कंपोस्ट तयार होईल तसे वापरते. स्वत: ग्राफीक डिझायनर आहे. घरात येणाऱ्या खोक्यांचा कौशल्याने वापर करून त्यात रताळी, वांगी, मिरची, टोमॅटो, काकडी अशा भाज्या लावते. प्लॅस्टिक कुंडय़ांमध्ये पालेभाज्या, ढोबळी मिरची, पावटय़ाचे वेल, बेसील लेटय़ुसही लावले आहे. ‘अगं, एक ड्रम बाजूला राहून गेला. परवा पाहिला तर त्यात सुंदर मुलायम माती तयार झाली होती.’ दिसणाऱ्या अन् न दिसणाऱ्या असंख्या जीवांनी आपली करामत दाखवली होती. रुचिरा आता इतरांनाही कंपोस्ट करण्यासाठी मार्गदर्शन करते.

The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला

एक दिवस पद्मा तळेकरचा फोन आला. ‘अगं बाल्कनीतल्या झाडावर छोटय़ा ब्राऊन पक्ष्यांनी घरटे केले आहे. गवती चहाची पाती, बांबूची पाने, गवताची पाती, चोचीने तोडून बोचक्यासारखे घरटे बांधले आहे. त्यांची लगबग, नाजूक आवाज, समूहाने काम करणे सगळेच लाजवाब. बघायला मजा येते,’ पद्मा सांगत होती. पद्माने सोसायटीत कंपोस्ट खड्डय़ासाठी खूप प्रयत्न केले. कंपोस्ट वापरून त्यात हेलीकोनिया, ब्रह्मकमळ, कोरफड, हळद, रताळं, जास्वंद, गवती चहा अशा वनस्पती लावल्या आहेत. पण ही आहे पक्षिवेडी, पक्ष्यांसाठी ती राळ पेरते. त्याची कणसं खायला मुनिया, बुलबुल असे पक्षी येतातच. पण पोपट घनेश, कोकिळा, होले अशा अनेक पक्ष्यांची तिच्या घरी वर्दळ असते.

वंदना जोगळेकरला माझ्याकडचे जुने सोलर ट्रेचे मॉडेल आवडले. तिच्या पाचव्या मजल्याच्या गच्चीत या ट्रेमध्ये ती पालक, कोथिंबीर, मेथी अशा पालेभाज्या लावते. बाजूच्या झाडांचा खूप पाला गच्चीत पडतो. तो तेथेच ट्रेमध्ये भरून त्यावर इनोरा कल्चर वापरून माती करते. कुंडय़ांमध्ये ही माती वापरून तिने गुलाब, जास्वंद, कढीपत्ता, कर्दळ, अंजीर, मिरची, लिंबू लावलं आहे. आल्याचे खूप पीक येते व या वेळी लिंबं खूप लागली आहेत, असे तिने सांगितले. ड्रममध्ये पपई, केळही आहेत.

सरिता वैद्य व्यवसायाने वैद्य. खूप व्यस्त. पण क्लिनिकमधील काढय़ांचा चोथा हिने वापरायचा ठरवला. माझ्याकडची माती घेऊन, मुलांच्या मदतीने कुंडय़ा भरल्या. तगर, जास्वंद, गुलाब अशी फुलझाडे, वांगी, मिरची, टोमॅटो अशा भाज्या लावल्या आहेत. आता काढा करून उरलेला चोथा या झाडांचे पोषण करत आहे. आपले व्यवसाय नोकरी सांभाळून सगळ्या हिरवा कोपरा फुलवत आहेत. मैत्रिणींमध्ये कंपोस्ट कल्चर वेगाने पसरत आहे. आता भेटीमध्ये कोणाकडे काय बहरात आहे, याची चर्चा असते. रोपांची देवाण-घेवाण असते. वांगी, मिरची, आळूच्या पानाची लूट असते. सुगरणी तर आलं, हळदीचं लोणचंही करून आणतात. असे जीवांचे मैत्र लाभले आहे, या पसायदानाने झोळी भरली आहे.

प्रिया भिडे (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)