पुणे : शहरातील वाढते गंभीर गु्न्हे, सराइतांच्या हालचाली टिपण्यासाठी पुणे पोलिसांकडून कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित (आर्टीफिशयल इंटेलिजन्स) सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित दोन हजार ८६६ कॅमेरे बसविण्यासाठी राज्य शासनाने ४३३ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सराइतांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारांना चाप बसणार आहे.
एआय तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रकारचे कॅमेरे पहिल्यांदाच बसविण्यात येणार आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. फेस रेकग्निझेशन तंत्रज्ञानामुळे गुन्हेगाराची माहिती त्वरित पोलिसांना म्हणजे पोलीस नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) मिळणार आहे. हे कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
हे ही वाचा… जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर भीषण अपघात, चालक गंभीर
‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित नवीन दोन हजार ८६६ कॅमेरे बसविण्यात येणार आहे. यापूर्वी शहर, तसेच उपनगरांत १३०० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नवीन तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसविण्यात आल्यास शहराची सुरक्षा अधिक सक्षम होणार आहे, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्याचा विस्तार वाढणार आहे.
देशातील गुन्हेगारांवर नजर
यापूर्वी शहरात बसविण्यात आलेले १३०० कॅमेरे ‘एआय’ तंत्रज्ञानानुसार अद्ययावत केले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पुण्यातील नव्हे, तर देशभरातील गु्न्हेगारांवर नजर ठेवण्यात येणार आहे. फेस रेकग्निझेशन तंत्रज्ञानावर आधारित असलेले हे कॅमेरे पुण्यातील नव्हे, तर देशभरातील गुन्हेगारांवर नजर ठेवतील. फरार आरोपी पुण्यातील कॅमेऱ्यांद्वारे टिपला गेल्यास त्याची माहिती त्वरित पोलिसांना मिळेल. शहरातील गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानक, एसटी स्थानकात हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. फरार आरोपीला हे कॅमेरे टिपतील. गु्न्हेगाराने वेशभूषा बदलली तरी त्याला टिपता येणे शक्य होईल.
हे ही वाचा… पुणे रेल्वे स्थानकातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण, गुजरातमधून महिलेसह दोघांना अटक; बालक सुखरुप
शहरात नवीन दाेन हजार ८८६ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नवीन कॅमेरे ‘एआय’ तंत्रज्ञाानानुसार आधारित आहेत. कॅमेऱ्यांसाठी राज्य शासनाने ४३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हे कॅमेरे बसविण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त