डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदा सोहळ्यात..

“आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लर्निंगच्या उदयानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे निश्चित आहे. आता केवळ साक्षर होणे पुरेसे नाही. ‘एआय’ साक्षर होणे आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य, सेवा क्षेत्रात एआय महत्वाची भूमिका निभावणार आहे. मात्र मानवी बुद्धी कोणत्याही एआयपेक्षा अधिक तरल आहे. एआयकडे सहानुभूती नसते. माणसाकडे आहे. एआय प्रेम भाव जाणत नाही. माणूस जाणतो. याच भावनेतून आपण समाज आणि देशाची सेवा करू शकतो. आपण विश्वगुरू होतो आणि मला विश्वास आहे की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल,” असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम रमेश बैस यांनी व्यक्त केला. नव्या उद्यमशील समाजात आपण प्रवेश करत आहोत. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण उद्योजक असला पाहिजे. जे कुठले काम, नोकरी करत असू त्या ठिकाणी उद्यमशीलतेच्या भावनेतून काम केले पाहिजे. संपूर्ण जग आपले कार्यक्षेत्र बनले पाहिजे. प्रत्येक तरूणाने जगातली एक तरी भाषा आत्मसात केली पाहिजे. स्वतःला केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरते सीमित न ठेवता देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे आवाहन श्री. बैस यांनी केले.

हेही वाचा >>>पुणे: हडपसरमध्ये कोयता गँगची दहशत; दुकानदारांकडे हप्ता मागणारे तिघे अटकेत

ते पिंपरीत डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे राज्यपाल बैस बोलत होते. या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रिज लिमिडेटचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि क्वालिटी ॲश्युरन्स ॲड एक्सलन्स सेल, रामय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बंगळुरूचे प्रमुख सल्लागार डॉ. पी. एन. राजदान यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे, कुलपती डॉ. पी. डी. पाटील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांच्यासह देशभरातून आलेले विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात आज सकाळी झालेल्या या सोहळ्यास उपस्थित होते.

हेही वाचा >>> पुणे: सडक सख्याहरीच्या त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न;ओैंध भागातील घटना

राज्यपाल बैस म्हणाले, “येत्या २०३० पर्यंत मशिन लर्निंगच्या माध्यमातून ४० ते ८० कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात, असा मॅकेन्झीचा अहवाल सांगतो. यातल्या ३७.५ कोटी लोकांना त्यांच्या कामाची श्रेणी पूर्णतः बदलावी लागेल. एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात केल्यास भारतीयांना एआय आणि मशिन लर्निंगमुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाता येईल. विद्यापीठांना माझा आग्रह असेल की आपल्या शिक्षण व्यवस्थेत एआय आणि मशिन लर्निंगचा समावेश करण्यावर चिंतन झाले पाहिजे. या व्यवस्थेचा लाभ उठवण्यासाठी रणनिती आखावी लागेल. एआयमुळे शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये बदल होणार आहेत.” मी आपल्याला सावध करू इच्छितो की एआयच्या बाबतीत आपण जगातील काही देशांच्या मागे आहोत. चांगली गोष्ट ही आहे की भारतीय नव्या गोष्टी वेगाने शिकतात. नव्या तंत्रज्ञानाशी भारतीय चटकन जुळवून घेतात. एआयच्या आगामी युगात आपल्याला निरंतर शिकत राहावे लागेल. प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी आपल्याला ‘स्किल, रिस्किल, अपस्किल’ च्या माध्यमातून तयार व्हावे लागेल, असे प्रतिपादन बैस यांनी केले.

Story img Loader