डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदा सोहळ्यात..
“आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लर्निंगच्या उदयानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे निश्चित आहे. आता केवळ साक्षर होणे पुरेसे नाही. ‘एआय’ साक्षर होणे आवश्यक आहे. शिक्षण, आरोग्य, सेवा क्षेत्रात एआय महत्वाची भूमिका निभावणार आहे. मात्र मानवी बुद्धी कोणत्याही एआयपेक्षा अधिक तरल आहे. एआयकडे सहानुभूती नसते. माणसाकडे आहे. एआय प्रेम भाव जाणत नाही. माणूस जाणतो. याच भावनेतून आपण समाज आणि देशाची सेवा करू शकतो. आपण विश्वगुरू होतो आणि मला विश्वास आहे की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल,” असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम रमेश बैस यांनी व्यक्त केला. नव्या उद्यमशील समाजात आपण प्रवेश करत आहोत. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण उद्योजक असला पाहिजे. जे कुठले काम, नोकरी करत असू त्या ठिकाणी उद्यमशीलतेच्या भावनेतून काम केले पाहिजे. संपूर्ण जग आपले कार्यक्षेत्र बनले पाहिजे. प्रत्येक तरूणाने जगातली एक तरी भाषा आत्मसात केली पाहिजे. स्वतःला केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरते सीमित न ठेवता देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे आवाहन श्री. बैस यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा