कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे जग बदलणार आहे. रोजगाराचे, व्यवसायाचे स्वरुप बदलणार असून  जे नवीन शिकणार नाहीत ते बाहेर फेकले जातील असा इशारा लेखक अच्युत गोडबोले यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरुर यांच्या वतीने आयोजित स्वर्गिय धनराज नहार स्मृति व्याख्यानमालेत ‘ माझा लेखन प्रवास व  कृत्रिम बुध्दिमत्ता ‘ या विषयावर लेखक अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंचावर मेघालय राज्यातील  जिल्हाधिकारी अभिजीत पठारे   माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे,  ॲड. सुभाष पवार,  डॉ .सदानंद गायकवाड,  डॉ. अखिलेश राजूरकर, संघपती भरत चोरडिया, समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक आदी उपस्थित होते .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रसंगी लोकजागृतीचे ॲड. ओमप्रकाश सतीजा यांच्या विशेष सन्मान करण्यात आला व गायत्री बोरुडे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गोडबोले म्हणाले की मी लिहिलेल्या पुस्तकांन मुळे अनेकांचे आयुष्य बदलून गेले. आपल्या जीवन प्रवास उलगडत त्यांनी सांगितले की सोलापूर येथील घरी लहान पासून  साहित्यीक कलावंत यांची  ये जा असायची. वडिल शिक्षक होते. गणिताची आवड असल्यामुळे रॅग्लर व्हायचे होते. दहावीला असताना बोर्डात १६ व्या क्रमांक आला. त्यानंतरचे शिक्षण पहिली नोकरी ,विविध कंपन्यातील  कामाचे अनुभव, त्यांनी सांगितले .

लेखक म्हणून सुरु झालेला प्रवास ही सांगितला. सगळ्या त-हेची आयुष्ये आपण पाहिली. जेथे असेल तिथे एक्सलन्ट राहायचे हा ध्यास राहिला. सतत अभ्यास करत राहिलो. पुस्तके वाचत राहीलो व त्यातुन स्वंत :ला घडवत गेलो. व्यसनाच्या आहारी ही गेलो ,नैराश्य ही आले कधी  कधी  आत्महत्येचाही विचार आला पण या सर्वांवर मात करुन त्यातून बाहेर पडलो . संगणक , विज्ञान , संगीत , साहित्य , अर्थशास्त्र , मानसशास्त्र या विविध विषयांवर ५६ पुस्तके प्रकाशित झाली असून नव्याने काही पुस्तके प्रकाशित होणार आहेत. किमयागार , मुसाफिरी या त्याच्या पुस्तकावर ही त्यांनी भाष्य केले. सध्या कृत्रिम बुध्दिमत्ते विषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

कृत्रिम बुध्दिमत्ते मुळे शिक्षक , कवि , साहित्यीक , संगीतकार , वकिल यांचे काय होणार याबाबतही चर्चा आहे . प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे बदल होणार आहे. विविध कामे कार्यालयात न जाता घरी बसून करता येतील. थ्रीडी प्रिटिंग तंत्रज्ञानामुळे ही सिव्हील इंजिनिअर्स , आर्किटेक्ट चे काय होणार असा प्रश्न करुन ते म्हणाले की पुढील २० ते २५ वर्षात तंत्रज्ञान बदलाचा वेग प्रचंड वाढलेला असणार आहे. लोकांच्या रोजगाराचे स्वरुप बदलणार असून जे नवे शिकणार नाही ते बाहेर पडतील हे वेगाने होणार आहे. नवीन नोक-याही तयार होतील.

उद्याचे जग काय आहे , कसे असणार आहे. हे जाणून घ्या .उद्याचे जग काय आहे हे कळले नाही तर आपण उद्याचा जगात तरणार नाही . कृत्रिम बुध्दीमत्तेचा विकासाचे तीन ट्प्प्ये त्यांनी यावेळी सांगितले. माझ्यातील कुतुहल जाग ठेवत नवीन जाणुन घेत असतो. .लोक काय म्हणतात याचा विचार न करता आपले काम करीत राहा असे गोडबोले म्हणाले.

समितीचे अध्यक्ष रविंद्र धनक यांचे यावेळी मनोगत झाले. प्रास्ताविक ॲड. विक्रम पाचंगे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय बारवकर यांनी केले.