पिंपरी चिंचवडमध्ये १५ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत हौशी नाट्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोगांचा सहभाग होता. या नाट्यस्पर्धेत ‘आय अॅग्री’ या नाट्यप्रयोगाला पहिला क्रमांक मिळाला. तर मलिका या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला. या दोन्ही प्रयोगांना मिळालेल्या पुरस्कारावर आक्षेप घेण्यात आले आहेत. राज्य शासनाने ज्या परीक्षकांना निकालाची जबाबदारी दिली होती त्यांचा नाटकाशी थेट संबंध नसून त्यांनी पक्षपात केल्याचा आरोप स्पर्धकांनी केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेत स्पर्धकांवर अन्याय होतो आहे असाही आरोप होतो आहे. या स्पर्धेची पुनर्पडताळणी करा नाहीतर आम्ही पुरस्कार करू असाही इशारा देण्यात आला आहे.
आय अॅग्री, थ्रो बॅक, शौझिया, प्लॅनिंग, द फिअर फॅक्टर, मलिका, सेकंड इनिंग, मालकीण मालकीण दार उघड, बॅलन्स शीट, निरूपण, पगला घोडा, प्यादं, कोण म्हणतं टक्का दिला?, सामसूम, महाशून्य, अरण्य ही नाटकं या स्पर्धेत सादर झाली. दरम्यान महाराष्ट्र शासन या स्पर्धेचे आयोजक आहेत. मात्र स्पर्धकांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत समन्वयकांनी नकार दिला आहे. तर पूर्वा खालगावकर या स्पर्धेच्या परीक्षक होत्या, त्यांनी नाटकाच्या निकालाचा निर्णय तिन्ही स्पर्धकांनी मिळून घेतल्याचे आणि कोणताही पक्षापात झाले नसल्याचे म्हटले आहे. तर गुरू वठारेही या स्पर्धेचे परीक्षक होते त्यांनीही या स्पर्धेत कोणताही पक्षपाती निर्णय झालेला नाही असे म्हटले आहे.