पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहर, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत सहकारनगर भागातून तब्बल १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने कोठे नेण्यात येत होते. यादृष्टीने तपास सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाकाबंदीत सहकारनगर पोलिसांनी शुक्रवारी १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. याबाबतची माहिती निवडणूक अधिकारी आणि प्राप्तिकर विभागाला कळविण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दिवसा आणि रात्रीही संशयित वाहनांची नाकाबंदी करण्यात येत आहे. सहकारनगर भागात शुक्रवारी सकाळी एका टेम्पो चालकाला नाकाबंदीत पोलिसांनी अडवले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनात मोठ्या प्रमाणावर साेने असल्याचे आढळून आले. नाकाबंदीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती त्वरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी सोने, तसेट टेम्पो जप्त केले आहे. कोट्यवधी रुपयांचे सोने कोठून आणले, तसेच ते कोणाला देण्यात येणार होते, यादृष्टीने तपास सुरू आहे. टेम्पो एका वाहतूकदाराचा असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा – पुणे : जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रे दुर्गम भागात, ‘मोबाइल नेटवर्क’ही मिळेना

हेही वाचा – उदंड जाहल्या ‘दिवाळी पहाट’

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात ग्रामीण पोलिसांनी एका मोटारीतून पाच कोटी रुपयांची जप्त केली होती. मावळ तालुक्यात पावणे अठरा लाखांची रोकड जप्त केली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As much as 128 crores worth of gold seized on the eve of assembly elections police action in sahakarnagar area of pune pune print news rbk 25 ssb