पुणे : पुण्यातील विद्यार्थ्यांचा गट दिल्ली व जालंधरच्या सहलीसाठी आला होता. ते सर्वजण पुण्यात विमानाने येणार होते. हे विद्यार्थी जालंधरहून दिल्लीला बसने येत असताना ते कोंडीत अडकले. त्यामुळे त्यांचे विमान चुकणार होते. या विद्यार्थ्यांनी तातडीने केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील कार्यालयाशी संपर्क साधून अडचण सांगितली. मोहोळ यांच्या कार्यालयाने तत्परतेने सूत्रे फिरवून त्या मुलांना त्याच दिवशी रात्री विमानाने पुण्यात आणले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणेकर्स एज्युकेशन इनिशिएटिव्हच्यावतीने त्या पुण्यातील शाळेतील १२० मुले आणि त्यांसोबत इतर २० जण असे १४० जण दिल्ली, जालंधरला शैक्षणिक सहलीसाठी गेले होते. त्यांची आमची परतीची तिकिटे बुधवारी (दि १७) रात्री ८:२० च्या विमानाची होती. विमानतळावर दोन तास आधी पोहोचण्यासाठी त्यांनी दिल्लीला येण्यासाठी बसने सकाळी साडेसात वाजता जालंधर सोडले. वाटेत अर्ध्यातासाचा लंचब्रेकही सर्वांनी घेतला. त्यांचा दिल्लीपर्यंतचा प्रवास निर्विघ्न झाला. खरी परीक्षा तिथूनच सुरू झाली.

हेही वाचा – भविष्यातील वाहने : ई-स्कूट, सेल्फ बॅलन्सिंग स्कूटर ते पॉड टॅक्सी!

दिल्लीच्या विमानतळापासून साधारणत २५ किलोमीटरवर त्यांच्या बस वाहतूक कोंडीत सापडल्या. मोहोळ हे नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री असल्याचे पुणेकर्स एज्युकेशन इनिशिएटिव्हच्या लीना म्हसवडे यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता मोहोळ यांच्या पुण्याच्या कार्यालयात फोन करून त्यांच्या स्वीय सहायकांना ही अडचण सांगितली. त्यांनी दिल्लीच्या कार्यालयातील एकाचा दूरध्वनी क्रमांक दिला. त्यांना दूरध्वनी केल्यानंतर चक्रे फिरली अन् अवघ्या दहाच मिनिटांत त्यांना इंडिगो एअरलाइन्समधून फोन आला.

एअरलाइन्सने मुलांची महिती घेतली आणि बसचे नेमके लोकेशनही घेतले. त्या वाहतूक कोंडीतून पुढे सरकत अखेर मुले विमानतळावर पोहोचली. कंपनीने काही जणांची सोय सव्वानऊच्या विमानात आणि इतरांची साडेअकराच्या विमानात व्यवस्था केली. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी मुलांची सुरक्षा तपासणीसाठी मदत केली. राज्यमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयाने दाखवलेल्या तत्परतेने ही सहल नियोजनानुसार उशिरा का होईना पण बुधवारी रात्रीच पुण्यात पोहोचली.

हेही वाचा – पिंपरी : अजित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का; विश्वासू शिलेदाराने सोडली साथ

आपण मंत्री आणि राजकारण्यांना नेहमी नावे ठेवतो, पण या प्रसंगाने एकंदर व्यवस्थेवरचा विश्वास कितीतरी पटीने वाढला. आपण मतदार म्हणून योग्य कार्यक्षम खासदार निवडून दिल्याबद्दल खूप समाधान वाटले. – लीना म्हसवडे, पुणेकर्स एज्युकेशन इनिशिएटिव्ह

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As soon as murlidhar mohol office was called the disruption in the air travel of 120 students was removed pune print news stj 05 ssb