अॅक्शन कमिटी महाराष्ट्र व मुलनिवासी मुस्लिम मंचच्या वतीने येत्या ४ फेब्रुवारीला पुण्यातील गोळीबार मैदानावर मुस्लिम आरक्षण परिषदेचे आयोजन केले आहे. ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) चे खासदार असुदुद्दीन ओवेसी हे यावेळी सभा घेणार आहेत. पुण्यातील गोळीबार मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता ही परिषद होणार आहे. मुस्लिम आरक्षण विषयावर ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे. ती आम्हाला लवकरच मिळेल, असे या परिषदेच्या संयोजकांनी सांगितले. दरम्यान, या परिषदेसंदर्भात शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी शनिवारी पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिले आहे. त्यामध्ये ‘ओवेसी यांच्या भाषणामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या तर शिवसेना सहन करणार नाही. सभा शिवसेनेच्यावतीने बंद पाडण्यात येईल. या परिस्थितीला आयोजक जबाबदार राहतील.’ असे म्हटले आहे. यावर सहपोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले की, या संदर्भात पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जाणार आहे. भाषण ध्वनिमुद्रित केले जाते. त्यामध्ये काही आक्षेपार्ह वाटल्यास कारवाई केली जाईल. अद्यापपर्यंत परवानगीसाठी आपणाकडे अर्ज आलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा