“रशिया आणि युक्रेन युद्धामुळं महागाई वाढली आहे. भारताच्या आजूबाजूच्या देशांची अवस्था बिकट झाली आहे. श्रीलंकेत महागाईमुळं आणीबाणी लावण्यात आली आहे. परंतु, १४० कोटी नागरिकांचा भारत देश ताठ मान करून उभा आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत,” असं मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले. तसेच, मनसेच्या युतीबाबतही त्यांनी भाष्य केलं. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले, रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. माणसांच्या मृत्यूचे खच हे चित्र देखील आपण पाहिलंय. त्यामुळं महागाई वाढत आहे. काही देशांची परिस्थिती बिकट झाली. जर भारताच्या आजूबाजूला असलेल्या देशांकडे पाहिलं तर लक्षात येतं. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचं सरकार कोसळलं आहे, ते क्लिन बोल्ड झालेत. श्रीलंकेत महागाई इतकी वाढली की आणीबाणी लावावी लागली.”
हेही वाचा : भाजपाची मनसेसोबत युती होणार की नाही? आशिष शेलार यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…!
“भारत देश १४० कोटी नागरिकांच्या भरोशावर अजूनही…”
“म्यानमार आणि बांग्लादेशमध्ये सुद्धा परकीय मदतीच्या आधारावर तो देश टिकेल अशी परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचा-आमचा भारत देश १४० कोटी नागरिकांच्या भरोशावर अजूनही ताठ उभा आहे. मोदींनी त्यासाठी केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत,” असं शेलार म्हणाले. मनसेसोबतच्या युतीचा मुद्दा सध्या विचारात नसल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.