मी मागील अडीच वर्षाच्या सरकारच्या काळात मंत्री म्हणून काम पाहिले.त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना जवळून पाहता आले.त्यामध्ये आजवर अनेक मुख्यमंत्री पाहिले. त्यामध्ये उद्धव ठाकरे हे शुद्ध मनाचे, निर्मळ आणि हिम्मतवाण मुख्यमंत्री पाहण्यास मिळाले. अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.तसेच उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : देवेंद्र फडणीसांच्या ‘पहाटेच्या शपथविधी’वरील विधानावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले “शरद पवार असं कधीच…”

कसबा विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली सभा पार पडली.यावेळी आरपीआय गवई गटाचे प्रमुख राजेंद्र गवई,आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार रमेश बागवे,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक सभेला उपस्थित होते.

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, मागील सहा महिन्यात आलेल सरकार हे प्रत्येक कामाला स्थगिती देणार सरकार ठरल आहे.मागील अडीच वर्षात ज्या कामांना मंजुरी मिळाली.त्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सत्ता कोणाची असो आपल राज्य हे अग्रेसर राहील पाहिजे अशी अपेक्षा असल्याच सांगत शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी निशाणा साधला.

हेही वाचा >>> “भारत जोडणाऱ्या राहुल गांधींबरोबर देश तोडणाऱ्या मोंदींची…”, नाना पटोलेंचा पंतप्रधानांवर घणाघात

तसेच ते पुढे म्हणाले की,भाजप विरोधात सर्व्ह आल्याने भाजपचे नेते फिरत असून २८८ पैकी २०० जागा भाजपच्या येणार आहेत.तर ४८ पैकी ४५ जागा भाजप जिंकणार आहे.अशा प्रकारची विधान भाजप नेत्यांकडून केली जात आहे.त्यामुळे उर्वरित जागा लक्षात घेता,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना काय मिळणार आहे.अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी टीका केली.

पी.सी. अलेक्झांडर यांनी कधीच चुकीची विधान केली

तत्कालिन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल बोलण्यासारख काही राहिले नाही.आता नव्याने येणार्‍या राज्यपालांनी चांगल काम कराव.हीच आमची अपेक्षा आहे.आपल्या राज्याच राज्यपालपदावर पी.सी. अलेक्झांडर यांनी चांगल्या प्रकारे काम केले. इंदिरा गांधी यांच सचिव म्हणून त्यांनी काम केले होत.सत्ताधारी आणि विरोधकांना सोबत घेऊन काम केले. कधी ही त्यांनी दुजाभाव केला नाही.आज देखील पी.सी. अलेक्झांडर यांचा नावलौकिक कायम असून निष्पक्ष पणे काम करणारे होते. तसेच त्यांनी कधीच चुकीची विधान केली नाही. त्यामुळे राज्यपाल कसा असाव तर पी.सी. अलेक्झांडर यांच्या सारखा असावा,अशी भूमिका यावेळी अशोक चव्हाण यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan praise uddhav thackeray as a chief minister in pune zws 70 svk
Show comments