पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून जगताप कुटुंबीयांनी वर्चस्व राखलेल्या या मतदारसंघात निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे. जगताप कुटुंबातील विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप या दीर-भावजय यांच्यातील ‘गृहकलहा’नंतर आता नाराज माजी नगरसेवकांकडून जगताप घराण्याला उघडपणे आव्हान दिले जात आहे. घराणेशाही आणि शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत माजी नगरसेवक, माजी शहर उपाध्यक्षाने पक्षाला सोडचिठ्ठी दिली. नाराज माजी नगरसेवकांचा मोठा गट लवकरच पक्षाला राम राम ठोकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगताप एकदा अपक्ष आणि दोनदा कमळावर असे तीन वेळा निवडून आले होते. जानेवारी २०२३ मध्ये त्यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून त्यांची पत्नी अश्विनी आणि बंधू शंकर यांच्यातील संघर्षाने गृहकलह चव्हाट्यावर आला. निवडणूक लढविण्यासाठी दोघेही तीव्र इच्छुक होते. पक्षाने अश्विनी यांना उमेदवारी दिली. सहानुभूती असतानाही त्यांना विजयासाठी झगडावे लागले. राष्ट्रवादीच्या नाना काटे यांनी ९९ हजार, तर अपक्ष राहुल कलाटे यांनी ४० हजार मते घेतली. महाविकास आघाडीतील बंडखोरीमुळे अश्विनी यांचा विजय सुकर झाला. परंतु, जगताप यांच्या विरोधात दीड लाख मतदार असल्याचे लक्षात येताच मागील पंचवार्षिकमध्ये महापालिकेतील महत्त्वाच्या पदापासून वंचित राहिलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकांनी थेटपणे विरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली. लक्ष्मण जगताप असताना पदापासून डावलूनही कोणीही उघडपणे बोलत नव्हते. याचे कारण त्यांचा दरारा, आदरयुक्त भीती होती.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
नक्षलवादी संविधानाला मानत नाही; भाजपलाही संविधान संपवायचे आहे – छत्तीसगड माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

हेही वाचा – पुणे : विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा धुमाकूळ, ३०० जणांचे मोबाइल चोरी; नाशिक, मध्य प्रदेशातील चोरटे गजाआड

विरोध करूनही शंकर यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याने नाराज माजी नगरसेवकांच्या गटाने ‘असहकारा’ची भूमिका घेतली. हा गट कधीच त्यांच्यासोबत दिसला नाही. आमदार अश्विनी यांना साथ देत या गटाने दीड वर्षे काम केले. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप कुटुंबातील दीर-भावजयीमध्ये समेट झाल्याचे आणि शंकर यांची भाजपची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा नाराज गट अस्वस्थ झाला. त्यातून शंकर यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षनेतृत्वाकडे तक्रार करत टप्प्याटप्प्याने राजीनामा देण्याचे नियोजन केल्याचे बोलले जाते. त्यानुसार पिंपळे निलख परिसराचे माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी चिंचवड विधानसभा क्षेत्रात पक्षात लोकशाही नसून, केवळ घराणेशाही असल्याचा आरोप करत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हीच भूमिका घेत वाकड भागातील भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनीही पक्ष सोडला. या नाराजांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे ओढा असल्याची चर्चा आहे. एकंदरीतच चिंचवड भाजपमध्ये मोठी धुसफूस असून, निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा – ‘ईवाय’मधील ‘सीए’ तरुणीच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

माजी नगरसेवकांचा भाजपला राम राम

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील माया बारणे, चंदा लाेखंडे, तुषार कामठे, संदीप कस्पटे या चार, तर भाेसरीतील एकनाथ पवार, रवी लांडगे, वसंत बाेऱ्हाटे, संजय नेवाळे आणि प्रियंका बारसे या पाच अशा नऊ माजी नगरसेवकांनी गेल्या दोन वर्षांत भाजपला राम राम ठोकला आहे.