दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर माझ्यावर भाजपने विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आणि लक्ष्मण जगताप यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने मला विजय केलं. आज जरी माझा वाघ (लक्ष्मण जगताप) गेला असला तरीही वाघीण जिवंत आहे. तोपर्यंत मी माझ्या पिलांना एकटं सोडणार नाही. असं विधान विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी केलं आहे. आज शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ काळेवाडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी आमदार अश्विनी जगताप बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आश्विनी जगताप म्हणाल्या, दिवंगत लक्ष्मण जगताप यांचं अकाली निधन झाल्यानंतर २०२३ मध्ये चिंचवड पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपनं माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतल्याने माझा विजय झाला. जरी माझा वाघ गेला असला तरी ही वाघीण जिवंत आहे, तोपर्यंत माझ्या पिल्लांना एकटं सोडणार नाही. पुढे म्हणाल्या, आमचा जगताप पॅटर्न आहे. आमचं १३ जणांचं कुटुंब नाही तर संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघ आमचं कुटुंब आहे. हेच कुटुंब शंकर जगताप यांना विजयी करेल. असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>>हिंजवडी आयटीपार्कमधून किती उद्योग बाहेर गेले? देवेंद्र फडणवीस यांनी आकडाच सांगितला

यावेळी उमेदवार शंकर जगताप यांनी ही भाषण केले. ते म्हणाले, भाऊ (दिवंगत लक्ष्मण जगताप) गेल्यानंतर कुटुंबावरील छत कोसळल होतं. ते भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी सावरलं. त्यांचे मी आभार मानतो. पुढे ते म्हणाले, तीन वेळेस चिंचवड च दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी प्रतिनिधित्व केलं. त्यांनी या मतदारसंघाचा विकास केला. मला चिंचवड ची जनता भरगोस मतांनी विजयी करेल असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashwini jagtap statement during devendra fadnavis meeting in kalewadi for shankar jagtap campaign kjp 91 amy