दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवड विधानसभा पोटणीवडणुकीची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या सक्रिय झाल्या आहेत. चिंचवड येथील मोरया गोसावी गणपतीचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप सक्रिय झाल्या आहेत. आज चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात जाऊन त्यांनी पदाधिकाऱ्यांसह गणपतीचे दर्शन घेतले. मग, प्रचाराला सुरुवात केली आहे. अश्विनी जगताप यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला.
हेही वाचा – “काँग्रेस पक्षाचा उमेदवार आज रात्री जाहीर होईल”, कसबा पोटनिवडणुकीवर नाना पटोलेंची माहिती
तुम्ही खंबीरपणे लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कोणालाही घाबरू नका, असा आशीर्वाद त्यांनी दिल्याचे अश्विनी जगताप यांनी सांगितले आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. उद्या सकाळी पिंपळे गुरव येथील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. यात अश्विनी जगताप सहभागी होणार असल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाला नाही. तर, दुसरीकडे भाजपा आढावा बैठका घेऊन प्रचार सुरू केला आहे.