पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्तपणे मतदान झाले. समाविष्ट भागातील चऱ्होली, मोशी, चिखली, दिघी, बोऱ्हाडेवाडी केंद्रावर सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भोसरीत भाजपचे महेश लांडगे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात दुरंगी चुरशीची लढत होत आहे. मोशी, चऱ्होली, चिखली, दिघी, तळवडे या ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. भोसरी गावठाण, इंद्रायणी भागातही मतदारांनी रांगेत उभे राहून मतदान केले. दिवसभर केंद्राबाहेर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. तर, झोपडपट्टीबहुल लांडेवाडी, गवळीमाथा, विठ्ठलनगर, नेहरूनगर, निगडी ओटा स्कीम या भागातील मतदार दुपारनंतर मतदानासाठी बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा >>>पिंपरीतील शेवटच्या टप्प्यातील मतदार कोणाला धक्का देणार?
मोशी, म्हेत्रेवस्ती, निगडी, यमुनानगर, रुपीनगर, तळवडे या परिसरामध्ये मतदानाच्या वेळेपर्यंत रांगेत आलेल्या मतदारांचे उशिरापर्यंत मतदान सुरू होते. शेवटच्या दोन ते तीन तासांत अधिकाधिक मतदान वाढावे, यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसले. दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाचा जोर चांगला होता. या वेळेत मतदानाचा आलेख ३०.४१ टक्क्यांपर्यंत गेला. दुपारी तीन वाजेपर्यंत दोन लाख ६३ हजार ५५९ मतदारांनी मतदान केले. तीनपर्यंत ४३.१६ टक्के मतदान झाले. सायंकाळी साडेचारनंतर पुन्हा मतदान केद्रांसमोर रांगा लागल्या होत्या. पाच वाजेपर्यंत तीन लाख ३५ हजार १२० जणांनी मतदान केले. ५५.०८ टक्के मतदान झाले. एकूण ६१.१४ टक्के मतदान झाले.
चिखली, घरकुल भागातील सात हजारांहून अधिक मतदारांची नावे कोंढवा, हडपसर मतदारसंघात स्थलांतरित झाल्याची तक्रार झाली. ‘जाणीवपूर्वक षडयंत्र करून आमची नावे इतर मतदारसंघांमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत. यातील सहा हजारांहून अधिक मते अल्पसंख्याक समाजाची आहेत,’ असाही दावा या नागरिकांनी केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम, भगवाधारी असा उल्लेख असलेल्या भगव्या, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘राम कृष्ण हरी’ असा मजकूर लिहिलेल्या पांढऱ्या टाेप्या परिधान केल्या हाेत्या.