आघाडीच्या पराभवात बंडखोर, वंचित, मनसेचा हातभार, कुठे घडला प्रकार ? महायुतीच्या उमेदवारांना दोन मतदार संघात तारले.

विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडविला आहे

assembly elections Mahayuti made strong run in state and literally blown away Mahavikas Aghadi
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी पाहता महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी विविध घटक कारणीभूत ठरले आहेत. (संग्रहित छायाचित्र)

पुणे : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडविला आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी ५० जागांवर विजय मिळविण्यात महाविकास आघाडीला यश आलेले नाही. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी पाहता महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी विविध घटक कारणीभूत ठरले आहेत. काही मतदारसंघांमध्ये ‘ हिंदू जिहाद ‘, ‘एक है तो सेफ है,’ ही घोषणा चालली असून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने अनेक मतदारसंघात बुस्टर देण्याचे काम केले आहे.

शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी वंचित बहुजन विकास आघाडी, मनसे, तसेच बंडखोर हा घटक कारणीभूत ठरला आहे. या मतदारसंघात या उमेदवारांना मते मिळाली नसती, तर ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली असती. या दोन्ही मतदारसंघांतील विजयी उमेदवारांचे मताधिक्य पाहता या उमेदवारांना मिळालेली मते महत्त्वाची ठरली आहेत.

Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

हेही वाचा…‘औषधनिर्माणशास्त्र’ची रखडलेली प्रवेश प्रक्रिया सत्तास्थापनेनंतरच… काय आहे कारण?

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून महायुतीने भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसकडून माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी दिली. याच मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने नीलेश आल्हाट यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत कांबळे यांचा १० हजार ३२० मतांनी विजय झाला. वंचितकडून निवडणूक लढविणाऱ्या आल्हाट यांना ८ हजार ८६९ मते मिळाली, तर नोटाला एक हजार ८१५ मते मिळाली. ही मते मिळाली नसती, तर येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाारांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली असती.

हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार चेतन तुपे यांनी महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांचा सात हजार मतांनी पराभव केला. या मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढविणारे साईनाथ बाबर यांना ३२ हजार १२१ मते मिळाली. तर महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बंडखोर गंगाधर बधे यांना सहा हजार ५८४ मते मिळाली. नोटाला तीन हजार मते पडली. या मतदारसंघात बधे यांची उमेदवारी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या विजयात अडथळा ठरली.

हेही वाचा…मराठी चित्रपटांना दिशा देणारा अनोखा प्रयोग… पुण्यात प्रायोगिक नाट्यगृहात चित्रपटाचे खेळ…

हडपसरची जागा शिवसेना (ठाकरे) पक्षाला सोडावी, अशी मागणी येथील शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी केली होती. मात्र त्यावर निर्णय न झाल्याने बाबर नाराज झाले होते. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसैनिक गंगाधर बधे यांना पाठिंबा देत बाबर यांनी त्यांच्या प्रचाराचे नेतृत्व केले. महाविकास आघाडीत झालेल्या बंडखोरीमुळे जगताप यांची मते कमी झाल्याचे या मतदारसंघातील निकालावरून दिसून आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assembly elections mahayuti made strong run in state and literally blown away mahavikas aghadi pune print news ccm 82 sud 02

First published on: 25-11-2024 at 08:51 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या