पुणे : महाराष्ट्रातील आमदारांसाठी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सहकार्याने प्रशासन अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर येथील विधानमंडळ येथे हा तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम चालेल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी केली.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम तुकडी प्रारंभावेळी नार्वेकर बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, तृणमुल काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुस्मिता देव, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार उल्हास पवार, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, मिटसॉगचे संचालक डॉ. के.गिरीसन या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>निवडणूक आयोगामोर सुनावणी सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे विधान म्हणाले, “अदृश्य शक्ती…”

राजकारणाचे गमक कळण्यासाठी विधानमंडळ आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये ‘एक्सचेंज प्रोग्राम’ सुरू करण्यात येईल. राष्ट्राच्या प्रगतीसाठी हा पाठ्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे, असे नार्वेकर म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजकारणात प्रवेश करावा. राष्ट्रभाव, दूरदृष्टी, भाषेवर नियंत्रण, वक्तृत्व असे गुण राजकारणात येताना अंगी असले पाहिजेत. तसेच विद्यार्थ्यांनी लक्ष्य निर्धारित करून आर्थिक, सामाजिक स्तरावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Story img Loader