पुणे : निपुण भारत योजनेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय आकलनाचे मूल्यमापन २२ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. या अंतर्गत प्रथम भाषा, गणित, परिसर अभ्यास, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे मूल्यांकन करण्यात येईल.

 राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राजेश पाटील यांनी मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने झालेल्या मार्गदर्शन सत्रात सर्वेक्षणाबाबतच्या सूचना दिल्या. मूल्यमापन विभागाचे उपविभाग प्रमुख महादेव वांढरे, भाषा विभागाचे उपविभाग प्रमुख डॉ. राजेश बनकर, गणित विभागाच्या उपविभाग प्रमुख डॉ. रत्नप्रभा भालेराव, अधिव्याख्याता वृषाली गायकवाड, इंग्रजी विभागाचे उपविभागप्रमुख डॉ. अरुण संगोलकर, ऊर्दू विभागाचे विषय सहायक तोसिफ परवेझ, परिसर अभ्याससाठी विज्ञान विभागाच्या उपविभागप्रमुख तेजस्विनी आळवेकर, सामाजिक शास्त्र विभागाच्या अधिव्याख्याता डॉ. ज्योती राजपूत यांनी मार्गदर्शन केले. सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक विकास गरड, डॉ. कमलादेवी आवटे, अभिनव भोसले या वेळी उपस्थित होते.

How to prepare for JEE Main 2025
JEE Main 2025 परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घरबसल्या अभ्यास कसा करावा?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
VIDYAADAN SAHAYYAK MANDAL THANE
सर्वकार्येषु सर्वदा : हुशार, गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचा निरंतर यज्ञ
Faculty Recruitment Newly Advertised Recruitment for 111 seats in two months
प्राध्यापक भरती नव्याने जाहिरात; १११ जागांवर दोन महिन्यांत भरती?
article about various government and private scholarships
स्कॉलरशिप फेलोशिप : ‘विद्यादान सहायक मंडळ’ शिष्यवृत्ती; गरजू मुलांच्या उच्च शिक्षणातील आशेचा किरण
Australia and Canada Visa Curbs Hit indian Students Hard
विश्लेषण : परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांची कोंडी का? स्थलांतरितविरोधी भावनेचा फटका?
schools, America, mobile phones,
विश्लेषण : विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेत शाळा आग्रही का? काही राज्ये कायदा करणार?
cet for admission to postgraduate engineering courses
पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी

निपुण भारत योजनेअंतर्गत दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय, विषयनिहाय आकलन किती झाले याची पडताळणी करणे, शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. शाळांतील शिक्षकांमार्फतच, शाळेच्या वेळेत करण्यात येईल. सर्वेक्षणात आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञांची मदत घेता येईल. सर्वेक्षणाच्या कालावधीत वर्गात तणावमुक्त वातावरण राहण्याची काळजी घेण्यात यावी. शाळेतील वर्ग, विद्यार्थिसंख्या, शिक्षक यांच्या संख्येनुसार, सुटीचा कालावधी विचारात घेऊन शाळास्तरावर नियोजन करता येईल.  http://www.maa.ac.in या संकेतस्थळाद्वारे सर्वेक्षणासाठीची साधने उपलब्ध करून दिली जातील. शिक्षकांनी या संकेतस्थळावरून साधने डाऊनलोड करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.

 विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार श्रेणी

सर्वेक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वतंत्रपणे मौखिक स्वरुपात, आवश्यकतेनुसार लेखी पद्धतीने चाचणी घेतली जाईल. सर्वेक्षणासाठी मूल्यांकन स्तर आणि निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार विचारलेल्या प्रश्नाला विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार प्रगत (३), प्रवीण (२), प्रगतशील (१) आणि प्रारंभिक (०) या दरम्यानची श्रेणी विद्यार्थ्यांला दिली जाईल. विद्यार्थ्यांना वरची श्रेणी मिळावी म्हणून शिक्षकांनी अतिरिक्त मदत करू नये. अतिरिक्त मदत केल्यास विद्यार्थ्यांचे आकलन नेमकेपणाने समजणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.