लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ केल्यानंतर विभागीय चौकशीत तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही कारवाई केली.

due to torture of wife and in laws youth committed suicide
पत्नीच्या छळामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नी,सासूसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image of the Supreme Court building
Ladki Bahin Yojana : “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप
Success Story Of Manoj Kumar Sahoo In Marathi
Success Story : यूपीएससी केली क्रॅक! पहिले आयएएस अधिकारी ज्यांना मिळाली प्रतिष्ठित पदावर नियुक्ती; वाचा, त्यांची गोष्ट
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

दांगट हे महापालिका सेवेत लिपिक म्हणून रुजू झाले होते. महापालिका आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी अभिनामाची सरळसेवेची रिक्त पदे भरतीसाठी २९ जुलै २०१३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरतीच्या अटी व शर्तींचे अधीन राहून दांगट यांना महापालिका आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी या गट ‘ब’ या पदावर नियुक्ती देण्यात आली होती. प्रशासन अधिकारी होताना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक होते. त्याबाबत त्यांना वेळोवेळी कळवूनही प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. दांगट यांच्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीत दांगट यांनी तीन अपत्ये असल्याचे मान्य केले. शासनाच्या १ जुलै २००५ च्या लहान कुटुंबाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले. त्यानुसार दांगट यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

आणखी वाचा-पत्नीच्या छळामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नी,सासूसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल

फेब्रुवारीअखेर होणार होते सेवानिवृत्त

सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांचा सेवा कालावधी २८ फेब्रुवारी २०२५ ला संपणार होता. पावणे दोन महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते. निवृतीला दीड महिन्यांच्या कालावधी शिल्लक असतानाच त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली आहे.

महापालिका प्रशासनाने माझी बाजू जाणून घेतली नाही. बडतर्फ करण्याची कारवाई अन्यायकारक आहे. याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे श्रीनिवास दांगट यांनी सांगितले.

Story img Loader