लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (वय ५७) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.
धुमाळ भारती विद्यापीठ भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहायला होते. सदनिकेतील गॅलरीतून ते १४ जानेवारी रोजी पाय घसरून पडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. धुमाळ यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर पोलीस दलात शोककळा पसरली.
आणखी वाचा-अमेरिकेत मराठी शिक्षणाऱ्या मुलांना बालभारतीकडून पाठ्यपुस्तके;शिक्षण विभागाचा निर्णय
धुमाळ पौड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक होते. त्यानंतर त्यांना पदोन्नती मिळाली. पुणे पोलीस दलात परिमंडळ एकमध्ये सहायक पोलीस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.