पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलाच्या विवाहाची पत्रिका वाटत असताना सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलीस दलात शोककळा पसरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे: मित्राच्या मोबाइलवर संदेश पाठवून खडकवासला धरणात तरुणाची आत्महत्या

सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे (वय ५२) ग्रामीण पोलीस दलातील पौड पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने ते रजेवर होते. पत्रिकेचे वाटप करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांचा अकस्मात मृत्यू झाल्याचे माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिंदे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.