खोडद येथील ‘जीएमआरटी’ या महाकाय दुर्बिणीसह आयुकाच्या गिरावली येथील दुर्बिणीला भेट देण्याची संधी खगोलशास्त्रविषयक शिबिरातून उपलब्ध होणार आहे. ‘अॅस्ट्रॉन- एस एच के ट्रस्ट’ या संस्थेतर्फे ‘अॅस्ट्रोटेन्मेंट’ या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ६ व ७ मे रोजी हे शिबिर होणार असून ते सशुल्क आहे.
संस्थेच्या संस्थापक श्वेता कुलकर्णी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नक्षत्रांची माहिती घेणे तसेच दुर्बिणीतून गुरू, शनि व मंगळ ग्रह, तारकापुंज व द्वैती तारे यात पाहता येतील. एरिक डेब्लॅकमिअर या अमेरिकन अंतराळवीराशी संवाद साधण्याबरोबरच विपुला अभ्यंकर यांची ‘डे टाइम अॅस्ट्रोनॉमी’ ही कार्यशाळाही शिबिरात होईल, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ८८०६१०७५१०
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा