पुणे : हडपसरमधील साडे सतरा नळी येथे टोळक्याने कुटुंबाला शिवीगाळ करत कोयत्याने वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली. इतकेच नाही तर हवेत कोयते फिरवून एका घरावर दगडफेकही केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रात्री दत्त नगर येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांना बापू मकवाना आणि प्रसाद ढगे यांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी परिसरात मोठ-मोठ्याने शिवीगाळ करत दहशत पसरवली. तक्रारदारांना शिवीगाळ केली. नंतर टेम्पोच्या काचा फोडत हातातील कोयते हवेत फिरवून दहशत माजवली. पुढे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी खाली पाडून गोंधळ घातला. तसेच, एका घरावर दगडफेक देखील केली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

हे ही वाचा…पिंपरी : बचत गटातील महिलांनी साकारला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा देखावा

औषध उधारीवर न दिल्याने चाकूने वार

औषध दुकानदाराने उधारीवर औषध न दिल्याच्या रागातून ग्राहकाने चाकूने दुकानदाराच्या डोक्यात आणि हातावर वार केल्याची घटना हडपसर येथील खंडोबा माळ येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मनोज सुदाम अडागळे (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वैभव मखरे (वय २६) यांनी तक्रार दिली आहे. मंगळवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली.

फेडेक्स कंपनीच्या नावाने सात लाखांची फसवणूक

फेडेक्स कंपनीच्या नावाने सायबर चोरट्यांनी आणखी एका तरुणाची तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांना पार्सलमध्ये अमली पदार्थ तसेच पारपत्र आणि सिमकार्ड मिळून आले आहेत. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये ही घटना घडली आहे.

हे ही वाचा…पुणे: मुंबई- बंगळुरु महामार्गालगत होणार एसआरए प्रकल्प; प्रकल्प रद्द होण्याकरिता ‘त्या’ व्यक्तीने घेतल्या मृत व्यक्तींच्या सह्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नऱ्हे परिसरात राहण्यास असून खासगी नोकरी करतात. त्यांना अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला. फेडेक्स कंपनीतून बोलत असल्याची माहिती देत सुनील कुमार नावाच्या व्यक्तीने दिल्ली पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. दिल्ली ते मलेशिया कडे जाणाऱ्या विमानात पार्सल दिले आहे का अशी विचारणी केली. ते पार्सल दिल्ली कस्टमने रोखले आहे. त्यात सोळा बनावट पारपत्र, ५८ सिमकार्ड तसेच ४५० ग्रॅम अमली पदार्थ मिळाले आहे, अशी बतावणी केली. हे बेकायदेशीर पाठविलेले वस्तू आमि अमली पदार्थ मिळाल्याने तुमच्यावर कारवाई होईल असे सांगत अटक देखील होऊ शकते अशी माहिती दिली. नंतर त्यांना कारवाईची भिती दाखवून त्यांना सात लाख रुपये पाठविण्यास भाग पाडत फसविले.

हे ही वाचा…Ajit Pawar : दिलीप मोहितेंना लाल दिव्याची गाडी देणार? आळंदीत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; जागावाटपावरही केलं भाष्य

तडीपार असताना शहरात फिरणाऱ्या सराईताला बेड्या

शहरातून तडीपार केले असताना पुन्हा शहराच्या हद्दीत येऊन नागरिकांना कोयत्याच्या सहायाने धमकावत आरडा ओरड करणार्‍या सराईत गुंडाला वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अभिजित उर्फ चौक्या तुकाराम येळवंडे (वय २६, रा. जाधव चाळ, कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यावेळी त्याच्याकडून एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.

चौक्या याला पोलिसांनी २८ ऑगस्ट २०२४ रोजी दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केलेल्या गुन्हेगारांना पुन्हा परत शहरात येण्यास मनाई असते. मात्र, तरीही हे गुन्हेगार पुन्हा शहरात येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, त्यांना पोलीस शोधत आहेत. १० सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कर्वेनगर येथील अब्दुल कलाम शाळेसमोर सराईत गुन्हेगार अभिजीत येळवंडे हा कोयत्याच्या साह्याने लोकांना धाक दाखवत असल्याची माहिती वारजे पोलिसांना मिळाली होती. तो आरडाओरड करून परिसरात दहशत पसरवत होता. तसेच मी इकडचा भाई असून माझी पोलिसांना टिप देता का ? म्हणत माझ्यासमोर या खल्लासच करून टाकतो, मला चौकया म्हणतात म्हणत कोयता हवेत फिरवत होता. आरोपी आरडाओरडा करत असलेल्या ठिकाणी पोलीस गेले असता, तो पोलिसांना पाहुन पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader