पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे गुरव येथे जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाला चक्क पुरुषाने सात फेरे मारले आहेत. आजचा हा सण महिलांसाठी असल्याचे नेहमीच बोललं जातं. याला छेद देत पुरुषांनी देखील वटवृक्षाला फेरे मारून स्त्री पुरुष समानता असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी हक्क संरक्षण या संस्थेकडून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी पत्नीसोबत पतीने देखील वटवृक्षाला सात फेरे मारले. हे या संस्थेचे दहावा वर्ष आहे.

आणखी वाचा-पुणे : अपघातानंतर वाहतूक पोलिसांना जाग; गंगाधाम रस्त्यावर जड वाहनांना बंदी

religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’

वटपोर्णिमा हा सण महिलांचा म्हणून ओळखला जातो. महिला जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आजच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करून वटवृक्षाला सात फेरे मारून प्रार्थना करतात. परंतु, याच परंपरेला छेद देत काही पुरुषांनी पुढे येऊन गेल्या दहा वर्षापासून वटवृक्षाला पत्नीसह स्वतः देखील सात फेरे घेऊन जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी अशी प्रार्थना करतात.

देशात आणि राज्यात केवळ स्त्री- पुरुष समानतेच्या गप्पा मारल्या जातात. प्रत्यक्षात मात्र खरंच स्त्री पुरुष समानता आहे का? याबाबत शासंका आहे. पुरुषांनी वेगळा उपक्रम घेऊन स्त्री पुरुष समानता असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, खरंच स्त्री पुरुष समानता आहे का? या प्रश्नाचे उत्तर मात्र नक्की शोधावं लागेल. यावेळी वसईत घडलेल्या घटनेचा तीव्र संताप महिलांनी बोलताना व्यक्त केला आहे. देशात आणि राज्यामध्ये स्त्री-पुरुष समानता या केवळ पोकळ गप्पा असल्याचं महिलांनी म्हटल आहे.

Story img Loader