पुणे : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या संशयावरून अटकेत असलेला लष्कराच्या संशोधन, विकास संस्थेचा (डीआरडीओ) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या जामीन अर्जास राज्य दहशतवादविरोधी पथकाने विरोध केला आहे. कुरुलकरला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो, तसेच तो पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क साधू शकतो, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड. विजय फरगडे यांनी शुक्रवारी न्यायालयात केला.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रदीप कुरुलकरने त्याचे वकील अ‍ॅड. हृषीकेश गानू यांच्यामार्फत न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. कुरुलकरच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश एस. व्ही. कचरे न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी (२५ ऑगस्ट) एटीएसचे वकील अ‍ॅड. फरगडे आणि कुरुलकरचे वकील अ‍ॅड. गानू यांनी त्यांचे लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले. कुरुलकर डीआरडीओमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहे. त्याला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाब टाकू शकतो.

pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा!…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
three days holiday to all schools
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
Why did industries move out of Hinjewadi ITpark Sharad Pawar told exact reason
हिंजवडी आयटीपार्कमधून उद्योग बाहेर का गेले? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण, म्हणाले…
vadgaon sheri vidhan sabha election 2024
पुणे: अटीतटीच्या सामन्यात ‘मैत्री’ निर्णायक? ‘या’ मतदार संघात आहे असे चित्र!

जामीन मंजूर झाल्यास तो पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क साधू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती अ‍ॅड. फरगडे यांनी युक्तिवादात केली. कुरुलकरविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याची डीआरडीओच्या समितीकडून चौकशी करण्यात आली होती. त्याने शत्रूराष्ट्राला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  कुरुलकरच्या जामीन अर्जावर येत्या मंगळवारी (२९ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.