पुणे : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार आणि साथीदारांनी एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना भवानी पेठेतील जुना मोटार स्टँड परिसरात घडली. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रेहान बागवान, रशीद कुरेशी, आरिफ शेख, मुख्तार पठाण, अल्ताफ शेख, वाहिद कुरेशी, बिलाल सय्यद, सोहेल पटेल (सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी केलेल्या मारहाणीत अहमद शेख (वय २८ रा. कुर्ला, मुंबई) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमद आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. मंगळवरी मध्यरात्री जुना मोटार स्टँड परिसरात अहमद आणि त्याचे मित्र गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढविला. कोयत्याने त्याच्यावर वार केले. टोळक्याने परिसरात गोंधळ घालून दहशत माजविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली. आरोपी आणि फिर्यादी अहमद यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्यांच्यावर या पूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे तपास करत आहेत.