पुणे : शहरात कोयता गँगने दहशत माजविली आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात कोयता गँगने अल्पवयीन मुलावर वार केल्याची घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका अल्पवयीन मुलाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगा आणि त्याचा भाऊ गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी टोळक्याने अल्पवयीन मुलाला शिवीगळ केली. एक महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केला. अल्पवयीन मुलाने वार हुकविला. कोयत्याचा वार मनगटावर बसल्याने अल्पवयीन मुलगा जखमी झाला. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव तपास करत आहेत.

हेही वाचा – पुणे : मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार, पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू

हेही वाचा – पुणे : ‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेनिमित्त काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी, मोहिमेची सुरुवात कोठून करायची यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद

गेल्या महिन्यात कोयता गँगने सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील खाऊगल्लीत दहशत माजविली होती. हल्लेखोरांनी कोयते उगारुन नागरिकांना धमकावले होते तसेच खाऊगल्लीतील खाद्यपदार्थांच्या गाड्यांची तोडफोड केली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on minor boy with sickle on dhairi area on sinhagad road pune print news rbk 25 ssb