पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांना धमकी देणे, धक्काबुक्की करण्यापासून मारहाणीपर्यंतचे प्रकार वारंवार घडत आहेत. नाकाबंदी, वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना मारहाण केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणारेच असुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे शहर व पुणे ग्रामीण दलाची विभागणी करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्या वेळी आयुक्तालयाच्या हद्दीत १४ पोलीस ठाणी होती. त्यानंतर चिखली पोलीस ठाणे कार्यान्वित झाले. त्यानंतर रावेत, शिरगाव-परंदवडी आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मंजूर झाले. सध्या १८ पोलीस ठाणी आहेत. वाकड, हिंजवडी, पिंपरी आणि भोसरी या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने अनुक्रमे काळेवाडी, बावधन, संत तुकारामनगर आणि दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

railway department instructed PCMC to demolish indira Gandhi Flyover
पिंपरी चिंचवड शहरातील पहिला उड्डाणपूल लवकरच इतिहासजमा?
Devendra Fadnavis vs Sanjay Raut
“…अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू”, राऊतांचा महायुतीला इशारा;…
Sudhir Tambe On Balasaheb Thorat
Sudhir Tambe : बाळासाहेब थोरातांबाबत सुधीर तांबेंचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपात गेले असते तर आज…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Punekars Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral on social media
PHOTO: “वेळ कधी सांगून येत नाही…” गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांसाठी लावली खास पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Pimpri, hitting with car, Pimpri car hit,
पिंपरी : मोटारीने धडक देऊन तरुणाला मारण्याचा प्रयत्न; बोनेटवरून…

हेही वाचा…पिंपरी चिंचवड शहरातील पहिला उड्डाणपूल लवकरच इतिहासजमा?

आयुक्तालयांतर्गत आता २३ पोलीस ठाणी झाली असून, हद्द वाढत आहे. आयुक्तालयामुळे गुन्हेगारी कमी होताना दिसत असताना, दुसरीकडे पोलिसांवर हल्ला होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास पोलीस झटत असतात. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. त्यामुळे पोलिसांचे कौतुकही करण्यात आले. मात्र, दरम्यानच्या काळात पोलिसांवरील हल्लेही वाढले आहेत. यापूर्वी पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्कीचे प्रकार घडत होते. आता थेट मारहाणीचेही प्रकार घडू लागले आहेत. काही जण पोलिसांवरच हात उचलू लागल्याने सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांनी कारवाईसाठी थांबवल्यास वाहनचालक त्यांना उद्धट भाषेत बोलतात, शिवीगाळ करतात. बघून घेईन, अशी धमकीही दिली जाते.

वाहतूक पोलिसांबाबत अशा प्रकारच्या घटना घडण्याचे प्रमाण अधिक आहे. बेशिस्त वाहनचालक आढळल्यास त्याला कारवाईसाठी थांबविल्यास हुज्जत घालून पोलिसांवर हात उगारला जातो. बिनधास्तपणे कशाही प्रकारे वाहन चालवायचे, कोणीही काहीही म्हणायचे नाही, अशी या चालकांची मानसिकता असते. आपल्या चुकीमुळे इतरांना धोका निर्माण होईल, याचे कसलेही भान त्यांना नसते. पोलिसांशी वाद घालून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते.

हेही वाचा…शेवगा ६०० रुपये किलोवर; दक्षिणेतील पावसामुळे दराचा उच्चांक

निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ८ नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी असताना एक संशयित वाहन थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, चालकाने भरधाव मोटार पोलिसाच्या अंगावर घातली. पोलिसाला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. दुसऱ्या घटनेत २२ नोव्हेंबर रोजी कुरुळीतील बर्गे वस्ती येथे वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला दुचाकीस्वार तरुणाने शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. २३ नोव्हेंबर रोजी फुगेवाडी चौक येथे वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करीत असताना एका दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी थांबवले. त्यावरून दुचाकीस्वाराने पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणारेच असुरक्षित असतील तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ganesh.yadav@expressindia.com