पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करुन टोळक्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घोरपडी गाव परिसरात घडली. या प्रकरणी शिवराज साेनवणे, विनेश धिवार, तुषार गायकवाड, सुमीत गायकवाड, राहुल गायकवाड, तेजस जाधव, संजय परदेशी यांच्यासह १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपी विनेश धिवार (वय १९) याला अटक करण्यात आली आहे. राज पप्पू राजपूत (वय ३४, रा. पंचशीलनगर, घोरपडी गाव) याने याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज राजपूत आणि मित्र सिद्धार्थ तूपघर रात्री घरी जेवण करत होते. त्या वेळी आरोपी राजपूत याच्या घरात शिरले. ‘‘तू पोलिसांचा खबरी आहे. तुला आज संपवून टाकतो’ अशी धमकी आरोपींनी दिली.

हेही वाचा : पिंपरी: विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून निर्घृण खून, पत्नीच्या मित्राला भोसकून दहाव्या मजल्यावरून ढकलले

आरोपी शिवराज सोनवणेने राजपूत याच्या डोक्यात तलवारीने वार केला. राजपूत घरातून बाहेर पळाला तेव्हा आरोपींनी राजपूत याचा पाठलाग केला. कोयते, तलवारी उगारुन आरोपींनी दहशत माजविली. आरोपी संजय परदेशीने राजपूत याची मावशी; तसेच बहिणीला धक्काबुक्की केली. आरोपी धिवारला अटक करण्यात आली असून साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक बिनवडे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on youth on suspicion of being a police informer ghorpadi pune print news tmb 01