पुणे : कसबा पेठेत किरकोळ वादातून शनिवारी रात्री दोन युवकांवर कोयत्याने वार करण्यात आले. या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आदित्य भुजबळ, पवन जाधव यांच्यासह दोघांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत केदार राम कुंभार (वय १८, रा. १०१९ कसबा पेठ) याने फिर्याद फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केदार आणि त्याचा मित्र यश पिंगळे पवळे चौक परिसरातील अग्रवाल प्राईड सोसायटीच्या आवारात शनिवारी (३१ डिसेंबर) रात्री आठच्या सुमारास मोबाइलवर गेम खेळत होते. त्या वेळी आरोपी सोसायटीच्या आवारात आले. तू रोहितचा मित्र आहे का ?, अशी विचारणा करुन आरोपींनी केदारवर कोयत्याने वार केले. त्या वेळी केदारचा मित्र रोहित दरेकर तेथे आला. आज तुझा खून करतो, असे सांगून आरोपींनी रोहितवर कोयत्याने वार केला. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.

Story img Loader