पवनमावळातील कोथुर्णे गावात किरकोळ कारणातून सुमारे २५ ते ३० जणांच्या टोळक्याने गावातीलच दलित वस्तीवर हल्ला करत धुडगूस घातल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
मिहद्र नाना सोनवणे (वय ४६, रा. समतानगर, कोथुर्णे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सचिन दत्तू दळवी, शेखर मारुती दळवी, सोपान ज्ञानेश्वर दळवी, सूर्यकांत दळवी, चंद्रकांत दत्तू दळवी, आकाश प्रकाश दळवी, दत्तू नारायण दळवी, भाऊ बाबू दळवी, वाघू येसू दळवी, सतीश राजाराम लोयरे, सचिन तुकाराम दळवी, सुनील तुकाराम कुंभार, काळू नथू दळवी, विठ्ठल बाळू दळवी, एकनाथ िनबळे, नंदू सतू दळवी, चंद्रकांत नथू दळवी आदींसह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथुर्णे येथे गावातील देवीची मिरवणूक सुरू होती. यावेळी सोनवणे हे कामावरून घरी येत असताना मिरवणूक आल्याने ते दुचाकी घेऊन रस्त्याच्या बाजूला उभे राहिले. यावेळी मिरवणुकीत नाचणारा सचिन दत्तू गवळी हा सोनावणे यांच्याजवळ गेला व त्यांचे कपडे फाडून त्याने त्यांना मारहाण केली. सोनवणे यांनी हा प्रकार आपल्या पुतण्यांना सांगितल्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार देण्यासाठी ते निघाले. ही माहिती गावातील तरुणांना मिळाल्यानंतर त्यांनी सोनवणे यांच्या घरावर व त्यांच्या आसपासच्या घरांवर हल्ला करत घरातील महिलांना व पुरुषांना मारहाण केली.
मावळातील कोथुर्णे गावात टोळक्याकडून दलित वस्तीवर हल्ला
पवनमावळातील कोथुर्णे गावात किरकोळ कारणातून सुमारे २५ ते ३० जणांच्या टोळक्याने गावातीलच दलित वस्तीवर हल्ला करत धुडगूस घातल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
Written by बबन मिंडे
Updated:
आणखी वाचा
First published on: 25-10-2015 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attacked on backward congestion in maval