लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वादातून एका अल्पवयीनावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. लक्ष्य कैलास गोयर (वय १७, रा. खडकी बाजार) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.याबाबत त्याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्य आणि आरोपींचा वाद झाला होता. वादातून रविवारी (१६ मार्च) आरोपींनी खडकीतील महादेववाडी परिसरात लक्ष्यला नेले. दाट झाडीत त्याला डांबून ठेवले. त्याला बेदम मारहाण करुन शस्त्राने वार केले. आमच्या नादाला लागला तर, गंभीर परिणाम होतील, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.

फ्लेक्सवर नाव न टाकल्याने मारहाण

फ्लेक्सवर नाव टाकण्यावरुन झालेल्या वादातून एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात चौघांना गज, तसेच बांबुने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत संजय राजेंद्र तावरे (वय ३६, रा. जांभळी, सांगरुण, ता. हवेली) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रुपेश तावरे, दीपक तावरे, वैभव तावरे, विष्णू उघडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लेक्सवर नाव न टाकल्याने आरोपींनी गावातील मुलांना मारहाण करण्याची घटना मंगळवारी (१८ मार्च) घडली. संजय तावरे यांनी मध्यस्थी केल्याने आरोपींनी तावरे, तसेच त्यांचा भाऊ संदीप, गणेश चौधरी, स्वप्नील बाबर यांन गज आणि बांबूने मारहाण केली. आरोपींनी गावात दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर तपास करत आहेत.

Story img Loader