पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या हडपसर भागातील असलेल्या जनसंपर्क कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली. या प्रकरणी सुरक्षा रक्षकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयाजवळील सायकल आगीत जळाली आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणात तीन जणांनी आग लावल्याचे आढळून आले आहे. हडपसर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हडपसर परिसरात आमदार रोहित पवार यांचे सृजन हाऊस इमारतीत जनसंपर्क कार्यालय आहे. त्यांच्या या कार्यालयात शनिवारी मध्यरात्री तिघांनी प्रवेश करुन आग लावली. आगीत एक सायकल जळाली आहे. कार्यालयाला आगीची झळ पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा